पीएमपीला अखेर मिळाली संचलन तूट
By admin | Published: June 14, 2016 04:43 AM2016-06-14T04:43:24+5:302016-06-14T04:43:24+5:30
पीएमपीला महापालिकेकडून देण्यात येणारी तसेच मागील तीन महिन्यांपासून थकविण्यात आलेली साडे बावीस कोटींची संचलन तुटीचा धनादेश सोमवारी पीएमपीला देण्यात आला.
पुणे : पीएमपीला महापालिकेकडून देण्यात येणारी तसेच मागील तीन महिन्यांपासून थकविण्यात आलेली साडे बावीस कोटींची संचलन तुटीचा धनादेश सोमवारी पीएमपीला देण्यात आला.
सीएनजी तसेच इतर थकीत देण्यासाठी पीएमपीला निधी उपलब्ध झाला असून सर्व थकीत देणी तातडीने देण्यात येणार असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. पीएमपीची वार्षिक संचलन तूट दोन्ही पालिकांनी देण्याचे राज्य शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार पुणे महापालिकेने ६० टक्के तर पिंपरी-चिंचवड महापालिकेने ४० टक्के निधी देणे बंधनकारक आहे. त्यानुसार, मागील आर्थिक वर्षाची संचलन तूट देण्यासाठी पिंपरी-चिंचवड पालिकेने ११ समान हत्यांमध्ये प्रतिमहिना सहा कोटी तर पुणे महापालिकेने साडेसात कोटी रुपये देण्यास मान्यता दिलेली आहे. एप्रिलपासून ही रक्कम मिळणे अपेक्षित आहे. त्यानुसार, पिंपरी-चिंचवड महापालिका हा निधी देत असली, तरी पुणे महापालिकेकडून गेल्या तीन महिन्यांपासून हा निधी अडविण्यात आला होता. हा निधी देण्यास स्थायी समितीने मान्यता दिलेली असली, तरी मुख्य सभेची मान्यता नसल्याचे सांगत लेखापाल विभागाकडून हा निधी अडविण्यात आला होता. (प्रतिनिधी)