पीएमपी करणार वीजनिर्मिती
By admin | Published: June 4, 2016 12:40 AM2016-06-04T00:40:15+5:302016-06-04T00:40:15+5:30
तोट्याच्या गर्तेत असलेल्या पीएमपीचा अनुत्पादक खर्च कमी करून त्याद्वारे तोट्यावर मात करत प्रवाशांना अधिकाधिक दर्जेदार सुविधा देण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून अभिनव उपक्रम हाती घेतले
पुणे : तोट्याच्या गर्तेत असलेल्या पीएमपीचा अनुत्पादक खर्च कमी करून त्याद्वारे तोट्यावर मात करत प्रवाशांना अधिकाधिक दर्जेदार सुविधा देण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून अभिनव उपक्रम हाती घेतले जात आहेत. प्रवाशांना विनाथांबा बससेवा, प्रवाशांसाठी स्मार्ट कार्ड, मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर आता पीएमपीकडून पारंपरिक ऊर्जेद्वारे वीजनिर्मितीसाठी पुढाकार घेण्यात आला आहे.
या उपक्रमाअंतर्गत स्वारगेट डेपोच्या छतावर सौरऊर्जा आणि वायुऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून त्याद्वारे प्रतिदिन ३५ केव्ही वीजेची निर्मिती केली जाणार आहे. ही सर्व वीज या डेपोच्या दैनंदिन कामकाजासाठी वापरली जाणार आहे. त्यामुळे या डेपोसाठी दरमहा येणारा तब्बल १ लाख रुपयांच्या विजेची बचत होणार आहे.
अशा प्रकारे ऊर्जा निर्मितीचा वाहतूक संस्थेचा हा देशातील
पहिला उपक्रम राहणार असून पीएमपीसाठी हा पथदर्शी ठरणार आहे. या प्रकल्पासाठी तब्बल १ कोटी १० लाख रुपयांचा खर्च येणार आहे. हा सर्व खर्च खासदार निधीतून
अनिल शिरोळे यांनी उपलब्ध करून दिला आहे.
असा आहे प्रकल्प
पारपंरिक ऊर्जा स्रोतांचा वापर करून सौर आणि वायू ऊर्जेचा वापर करून हा प्रकल्प एकत्रित स्वरूपात उभारला जाणारा आहे. त्या अंतर्गत २० केव्ही उर्जा वाऱ्याद्वारे तर १५ केव्ही ऊर्जा सौर पॅनेलद्वारे निर्माण केली जाणार आहे. सध्या या डेपोमध्ये वीज महावितरणकडून घेतली जाते. त्यासाठी महिन्याला एक लाख रुपये खर्च येतो.