पीएमपीला केवळ 10 दिवसांचाच दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 08:52 PM2018-10-16T20:52:29+5:302018-10-16T20:53:19+5:30

डिझेलच्या दरात तब्बल 3 रुपये 66 पैशांची वाढ करण्यात अाल्याने पीएमपीला राेज 1 लाख 39 हजारांचा अतिरीक्त बाेजा पडणार अाहे.

PMP gets relief for only 10 days | पीएमपीला केवळ 10 दिवसांचाच दिलासा

पीएमपीला केवळ 10 दिवसांचाच दिलासा

googlenewsNext

पुणे : पीएमपीला मिळणाऱ्या डिझेलचा दर कमी करुन 10 दिवस हाेत नाहीत ताेच पुन्हा एकदा दरवाढ करण्यात अाल्याने पीएमपीची परीस्थिती पुन्हा एकदा जैसे थेच झाली अाहे. मंगळवारी डिझेलच्या दरात तब्बल 3 रुपये 66 पैशांची वाढ करण्यात अाल्याने पीएमपीला राेज 1 लाख 39 हजारांचा अतिरीक्त बाेजा पडणार अाहे. 

    सातत्याने बंद पडणाऱ्या बसेस, देखभाल दुरुस्तीचा वाढलेला खर्च, जुन्या बसेसमुळे अधिक खर्च हाेणारे डिझेल यामुळे अाधीच पीएमपीचे कंबरडे माेडलेले असताना अाता डिझेल दरवाढीचा झटका पीएमपीला बसला अाहे. या अाधी सप्टेंबर या एकाच महिन्यात तब्बल 6 रुपये 25 पैशांनी डिझेल महागले हाेते. त्यानंतर अाता पुन्हा एकदम 3 रुपये 66 पैसे म्हणजे जवळजवळ चार रुपयांनी डिझेल महागले अाहे. याचा माेठा फटका पीएमपीला बसणार अाहे. 1 अाॅक्टाेबर राेजी पीएमपीला उपलब्ध हाेणाऱ्या डिझेलचा दर 75. 1 पैसे इतका हाेता. त्यतांतर सरकारने व्हॅट कमी केल्याने 6 अाॅक्टाेबर राेजी हा दर 72.20 पैसे इतका झाला हाेता. त्यानंतर दहाच दिवसात मंगळवारी पुन्हा एकदा दरवाढ करण्यात अाली असून 6 अाॅक्टाेबरला पीएमपीला उपलब्ध हाेणाऱ्या डिझेलची किंमत 72. 20 पैशांवर जाऊन पाेहचली अाहे. त्यामुळे दरराेज 1 लाख 39 हजार 80 रुपये इतका अतिरिक्त भार पीएमपीवर पडणार अाहे. 

    दरम्यान, सातत्याने डिझेलची किंमत वाढत असल्याने पीएमपी भाडेवाढ करण्याची शक्यता अाहे. 
 

Web Title: PMP gets relief for only 10 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.