निवडणुकीत वापरलेल्या ९६८ बसमधून पीएमपी मालामाल; पीएमपीला २ कोटींपर्यंत उत्पन्न प्राप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 09:36 IST2024-11-30T09:35:35+5:302024-11-30T09:36:31+5:30

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून 'पीएमपी' च्या ९६८ गाड्या आरक्षित करण्यात आल्या होत्या. विधानसभेच्या निवडणुकीत मतदान यंत्रांची ...

PMP goods from 968 buses used in elections | निवडणुकीत वापरलेल्या ९६८ बसमधून पीएमपी मालामाल; पीएमपीला २ कोटींपर्यंत उत्पन्न प्राप्त

निवडणुकीत वापरलेल्या ९६८ बसमधून पीएमपी मालामाल; पीएमपीला २ कोटींपर्यंत उत्पन्न प्राप्त

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून 'पीएमपी' च्या ९६८ गाड्या आरक्षित करण्यात आल्या होत्या. विधानसभेच्या निवडणुकीत मतदान यंत्रांची वाहतूक करण्याकरिता निवडणूक आयोगाने पीएमपीच्या ९६८ बस आरक्षित केल्या होत्या त्यात, पुण्यातील आठ आणि पिंपरी चिंचवड मधील तीन मतदारसंघ मिळून एकूण ११ मतदारसंघासाठी या गाड्यांचा वापर करण्यात आला. यातून पीएमपीला २ कोटी ४ लाख ९६ हजार ४३२ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

या मार्गावर होत्या सेवा पीएमपीएलच्या बसेस

चिंचवड स्व. शंकरराव गावडे सभागृह थेरगाव (पाण्याच्या टाकीजवळ) येथील १११ बस, पिंपरी ॲटो क्लस्टर सायन्स पार्क समोर चिंचवड येथे ७१ बस, भोसरी गुरुकुल इडब्ल्यूएस टाऊन हॉल घरकुल चिखली १११ बस, वडगाव शेरी राजाराम भिकू पठारे स्टेडियम खराडी येथील ९८ बस, शिवाजीनगर कृषी महाविद्यालय येथे ६० बस, कोथरूड विश्वशांती गुरुकुल स्कूल एमआयटी पौड रोड कोथरूड येथे ७५ बस, खडकवासला सिंहगड कॉलेज आंबेगाव येथे ११२ बस, पर्वती शेट दगडूराम कटारिया हायस्कूल महर्षीनगर येथे ६३ बस, हडपसर चंद्रभागा बाबूराव तुपे साधना विद्यालय माळवाडी हडपसर येथे ११७ बस, पुणे कॅन्टोन्मेंट बीजे मेडिकल ग्राउंड येथे ६२ बस, तर कसबा पेठ गणेश कला क्रीडा केंद्र स्वारगेट येथे ११२ बस होत्या. यानुसार निवडणुकीसाठी लागणाऱ्या बसेसची सोय करण्यात आली होती.

प्रवाशांचे झाले हाल  

‘पीएमपी’ च्या ताफ्यात सुमारे २००० बस आहेत. त्यापैकी १६५० बस रस्त्यावर धावतात. ही संख्या आधीच कमी होती, त्यातील चांगल्या ९६८ बस निवडणुकीच्या कामासाठी देण्यात आल्या होत्या. दहा लाखांच्या वरती प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी फक्त ६८२ बसेस चालू होत्या. यात (दि. १९ ) आणि (दि. २०) नोव्हेंबर रोजी अनेक बसफेऱ्या रद्द झाल्या त्यामुळे परिणामी निवडणुकीच्या काळात प्रवाशांची गैरसोय झाली .

Web Title: PMP goods from 968 buses used in elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.