रस्ता क्रॉस करणाऱ्या व्यक्तीला पीएमपीने उडवले; ज्ञानेश्वर चौकातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 10:13 PM2019-08-19T22:13:25+5:302019-08-19T22:13:39+5:30
ज्ञानेश्वर पादुका चौकात रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला पीएमपी बसने उडवले
पुणे : रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला पीएमपी बसने उडवले. ज्ञानेश्वर पादुका चौकामध्ये सोमवारी रात्री 9.30 च्या सुमारास ही घटना घडली. अपघातात पादचारी गंभीर जखमी झाला असून नागरिकांनी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर पादुका चौकात रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला पीएमपी बसने उडवले. वज्र 2 क्रमांकाची वाघोलीकडे जाणारी ही बस होती. सिग्नल सुटल्यानंतर बस चौकातून मॉर्डन महाविद्यालायकडे चालली होती. त्यावेळी रस्ता ओलांडणाऱ्या पादचारी पीएमपी बसच्या पुढच्या चाकाखाली सापडला. अपघात घडल्यानंतर बसचा चालक पळून गेला. पादचारी बसच्या चाकाखाली अडकल्याने नागरिकांनी बस ढकलून त्याला बाहेर काढले. या अपघातात पादचारी गंभीर जखमी झाला. नागरिकांनी त्याला एका खासगी वाहनातून जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान चौकातच अपघात झाल्याने मोठा जमाव याठिकाणी जमा झाला होता. चालक बस सोडून पळून गेल्याने चौकातच बस अडकली होती. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चौकातील गर्दी कमी केली.