वर्षानंतरही पीएमपी होईना ई-कनेक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 04:26 AM2018-04-29T04:26:22+5:302018-04-29T04:26:22+5:30

प्रवाशांना बसेसची माहिती रिअल टाईम मिळावी, या प्रमुख उद्देशाने तयार करण्यात आलेल्या ‘पीएमपी ई-कनेक्ट’ अ‍ॅपला प्रवाशांचा प्रतिसाद मिळताना दिसत नाही

PMP Honey E-Connect even after the year | वर्षानंतरही पीएमपी होईना ई-कनेक्ट

वर्षानंतरही पीएमपी होईना ई-कनेक्ट

Next

पुणे : प्रवाशांना बसेसची माहिती रिअल टाईम मिळावी, या प्रमुख उद्देशाने तयार करण्यात आलेल्या ‘पीएमपी ई-कनेक्ट’ अ‍ॅपला प्रवाशांचा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. सुमारे १० लाख प्रवासी संख्या असूनही जवळपास ५० हजार प्रवाशांनीच हे अ‍ॅप मोबाइलमध्ये घेतल्याचे दिसते. तसेच बसचे अपुरे वेळापत्रक, नेटवर्कमधील अडचणी, रिअल टाईमचा दावा फोल ठरत असल्याने ‘पीएमपी’ वर्षभरानंतरही प्रवाशांशी ‘ई-कनेक्ट’ झालेले नाही.
पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून प्रवाशांना थेट पीएमपीशी जोडण्याच्या उद्देशाने ‘पीएमपी ई-कनेक्ट’ हे अ‍ॅप तयार केले. दि. ७ जून रोजी हे अ‍ॅप प्रवाशांसाठी खुले केले. प्रवाशांचा त्रास कमी करण्यासाठी प्रत्येक बसची ‘रिअल टाईम’ वेळ कळावी, त्यानुसार त्यांना प्रवासाचे नियोजन करणे सोपे जावे, बसचे सध्याचे ठिकाण, बससेवेविषयी तक्रारी, वेळापत्रक अशा विविध गोष्टींचा समावेश या अ‍ॅपमध्ये करण्यात आलेला आहे. मात्र, जवळपास वर्ष पूर्ण होऊनही अद्यापही अ‍ॅपमध्ये अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास आले आहे. अधिकाधिका प्रवाशांनी या अ‍ॅपचा उपयोग करणे अपेक्षित होते. परंतु, मागील वर्षभरात जवळपास ५० हजार प्रवाशांनीच हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. त्यापैकी अनेक प्रवाशांनी अ‍ॅपचा वापर बंद केला आहे.
‘रिअल टाईम’चा प्रशासनाचा दावा फोलच ठरत आहे. प्रवाशांना अ‍ॅपवर एखादी बस काही मिनिटांत येणार असल्याचे दिसते. मात्र, काही वेळाने पुन्हा त्यात बदल होऊन नवीन वेळ येते. बस संबंधित स्थानकावरून गेल्यानंतर ती येणार असल्याचे वेळ दर्शविली जाते.

थांब्यावर दिलेल्या वेळेत बस येत नाही, अशा प्रवाशांच्या तक्रारी आहेत. बसथांब्यांची माहिती, तिथपर्यंत जाण्याचे पायी अंतर, बसेसच्या वेळा अ‍ॅपवर दिसत आहे. पण ज्या हेतूने हे अ‍ॅप तयार करण्यात आले, तो हेतूच साध्य होताना दिसत नाही. गुगल प्ले स्टोअरवर अ‍ॅप डाऊनलोड केलेल्यांपैकी १ हजार १३१ प्रवाशांना प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यापैकी ४९५ प्रवाशांनी पाच स्टार आणि १४७ प्रवाशांनी चार स्टार दिले आहेत. मात्र, त्यापैकी काहींनी रिअल टाईमच्या मुद्यावर नाराजी व्यक्त केल्याचे दिसते. तर ३३५ प्रवाशांनी एकच स्टार देऊन हे अ‍ॅप नाकारले आहे. एकूण ५५ प्रवाशांनी दोन आणि ९९ जणांनी तीन स्टार दिले आहेत.
तेजस्विनी येईना ‘अ‍ॅप’वर : महिला दिनादिवशी खास महिलांसाठी ९ मार्गांवर सुरू करण्यात आलेल्या तेजस्विनी बससेवेला अद्याप ई-कनेक्ट अ‍ॅपवर स्थान मिळालेले नाही. दररोज एकूण ३० बसेसमार्फत २१८ फेऱ्या होतात. तसेच मागील वर्षभरात अन्य काही मार्ग बंद करून काही नवीन मार्गही सुरू करण्यात आले आहेत. त्याचीही माहिती अ‍ॅपवर अद्ययावत करण्यात आलेली नाही. अ‍ॅपवर सुरुवातीला दिलेले वेळापत्रकच झळकत आहे. दरम्यान, ही माहिती अद्ययावत केली जात असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.

Web Title: PMP Honey E-Connect even after the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.