खासगी ठेकेदाराला ‘पीएमपी’ची नोटीस
By admin | Published: December 10, 2014 12:06 AM2014-12-10T00:06:01+5:302014-12-10T00:06:01+5:30
पिरंगुट घाटात ब्रेकफेल झालेली बस गुप्ता ट्रॅव्हल्स या खासगी ठेकेदाराची होती. या ठेकेदाराला पीएमपी प्रशासनाने नोटीस पाठविली असून, झालेल्या गंभीर प्रकाराबाबत खुलासा मागविला आहे.
Next
पुणो : पिरंगुट घाटात ब्रेकफेल झालेली बस गुप्ता ट्रॅव्हल्स या खासगी ठेकेदाराची होती. या ठेकेदाराला पीएमपी प्रशासनाने नोटीस पाठविली असून, झालेल्या गंभीर प्रकाराबाबत खुलासा मागविला आहे. तसेच, संबंधित बसची तपासणी करण्यात येणार आहे.
कोथरूड डेपोची ‘एमएच 12 एफसी 3क्66’ क्रमांकाची बस सोमवारी दुपारी 4 च्या सुमारास डेक्कन स्थानकातून शेरे (ता. मुळशी) या गावाकडे निघाली होती. पिरंगुट घाटात आल्यानंतर या बसचे ब्रेकफेल झाले. मात्र, चालक रामदास मेंगडे यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला. ही बस गुप्ता ट्रॅव्हल या खासगी ठेकेदाराची आहे. मंगळवारी सकाळी पीएमपीचे मुख्य अभियंता सुनील बुरसे यांनी झालेल्या प्रकाराची माहिती घेतली. त्यानंतर कोथरूड डेपो व्यवस्थापकांमार्फत ठेकेदाराला नोटीस पाठविण्यात आली. (प्रतिनिधी)
ठेकेदाराने लपविला अपघात?
4पिरंगुट घाटात सायंकाळी पाचच्या सुमारास अपघात होऊनही पीएमपी प्रशासनाला सोमवारी रात्री उशिरार्पयत त्याची खबरबात नव्हती.
4वास्तविक, अपघात झाल्यानंतर त्याची माहिती पीएमपीच्या संबंधित विभागाला तातडीने कळविणो आवश्यक असते.
4अशी माहिती चालक व वाहकांकडून कळविलीही जाते; मात्र ही बस खासगी ठेकेदाराची असल्याने प्रशासनाला याची माहिती मिळाली नाही. ठेकेदारामार्फत ब्रेकफेल झालेली बस त्या ठिकाणाहून हलवून डेपोत आणली जात होती. हे काम डेपो व्यवस्थापकांना अंधारात ठेवून सुरू होते, असे समजते.
ठेकेदाराला झालेल्या अपघातप्रकरणी खुलासा देण्यास सांगितले आहे. ब्रेकफेल झालेली बस दुरुस्त करून लगेच मार्गावर आणण्यासही मनाई करण्यात आली आहे. ही बस दुरुस्त केल्यानंतर पीएमपीच्या अभियंत्यांना दाखवून त्याची तपासणी करावी व त्यानंतरच सेवेत आणावी.
- सुनील बुरसे
मुख्य अभियंता, पीएमपी