पीएमपी प्रवासी मित्रंचे 100 100 मिशन
By admin | Published: November 1, 2014 12:03 AM2014-11-01T00:03:24+5:302014-11-01T00:03:24+5:30
नागरिकांचा पीएमपी बस सेवेचा प्रवास सुरळीत तसेच सुरक्षित होण्यासाठी त्यांना कोणत्या अडचणी येतात, यासाठी 1क्क् प्रवासी मित्र 1क्क् दिवस बसने प्रवास करणार आणि त्यांना रोज कोणत्या अडचणी आल्या,
Next
पुणो : नागरिकांचा पीएमपी बस सेवेचा प्रवास सुरळीत तसेच सुरक्षित होण्यासाठी त्यांना कोणत्या अडचणी येतात, यासाठी 1क्क् प्रवासी मित्र 1क्क् दिवस बसने प्रवास करणार आणि त्यांना रोज कोणत्या अडचणी आल्या, बस प्रवासातील निरीक्षणो, कौतुक ते पीएमपी हेल्पलाईनला कळविणार आहेत. ही मोहीम 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता सावरकर स्मारक कर्वे रस्ता येथून सुरू होईल, अशी माहिती जुगल राठी यांनी दिली.
पीएमपी प्रवाशांच्या समस्या दूर करण्यासाठी वरिष्ठाकडे व शासनाकडे त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी पीएमपी मिशन 1क्क् अॅट 1क्क् या मोहिमेची आखणी करण्यात आली.
यामध्ये बसने प्रवास करणा:या सजग स्वंयसेवक 1क्क् प्रवासी मित्रंची खालील अटींवर नोंदणी करण्यात आली आहे. आठवडय़ात किमान एक वेळ पीएमपी बसने प्रवास करावा, 1 नोंव्हेबरपासून 1क्क् दिवस सातत्याने दररोज एक किंवा आठवडय़ातील प्रवासातील निरीक्षणो, सूचना, तक्रार पीएमपी हेल्पलाईनला दूरध्वनी, एसएमएसने कळवून तक्रार क्रमांक मागून त्यांची माहिती घ्यावी, बस प्रवासाचे सर्व नियम पाळावेत. या सर्व सूचनांचे पालन प्रवासी मित्रने करावे. तसेच, पीएमपी हेल्पलाईनचा वापर प्रत्येक नागरिकाने करावा, असे अवाहन करणारी 1क् हजार पत्रके प्रवांशाना वाटण्यात येतील, असे राठी म्हणाले. या वेळी पवन अय्यंगार, सतीश चितळे आदी उपस्थित होते.
1क्क् प्रवासी मित्रंमार्फेत 1क्क् दिवसांत 1क् हजार बस प्रवासाची निरीक्षणो थेट पीएमपीकडे नोंदविण्याचे लक्ष्य आहे. पीएमपी हेल्पलाईनला (क्2क्245क्3355) कॉल करून सकाळी 6 ते 1क् वेळेत प्रत्येक नागरिक आपली तक्रार या नंबरवर नोंदवू शकतो. (प्रतिनिधी)