पीएमपीच्या प्रवाशाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 03:16 AM2017-08-03T03:16:32+5:302017-08-03T03:16:32+5:30

बस थांब्यावर गाडी का थांबवली नाही, असा जाब विचारणाºया प्रवाशाला चालक आणि वाहकाने मारहाण केल्याचा करण्याचा धक्कादायक प्रकार पुणे स्टेशन येथील बसस्थानकावर घडला.

PMP striking the driver | पीएमपीच्या प्रवाशाला मारहाण

पीएमपीच्या प्रवाशाला मारहाण

Next

पुणे : बस थांब्यावर गाडी का थांबवली नाही, असा जाब विचारणाºया प्रवाशाला चालक आणि वाहकाने मारहाण केल्याचा करण्याचा धक्कादायक प्रकार पुणे स्टेशन येथील बसस्थानकावर घडला. याप्रकरणी संबंधीत प्रवाशाने चालकाविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली असून, या घटनेबाबत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान इतका गंभीर स्वरूपाचा गुन्हा असतानाही या दोघांना डेपो मॅनेजर पुणे स्टेशन आगाराकडून त्यांना आज दिवसभर कोणतीही ड्युटी लावण्यात आलेल्या नाही, एवढीच काय ती कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यासंदर्भात रिपोर्टिंग झाले आहे, संबंधित अधिकाºयांकडून कारवाई केली जाईल, असे पीएमपीकडून सांगण्यात आले आहे.
इर्शाद पिरजादे (वय ६६, रा. दापोडी) हे पुणे स्टेशन परिसरातील नवीन जिल्हाधिकारी इमारती जवळील बसथांब्यावर सायंकाळी पाचच्या सुमारास दापोडीला जाण्यासाठी थांबले होते. त्याच दरम्यान चिंचवडगावला जाणारी बस आली परंतु ती थांब्यावर न थांबताच पुढे गेली. जवळच गतिरोधक असल्याने चालकाने वेग कमी केल्याने पिरजादे यांनी पळत जाऊन बस थांबवली. पिरजादे यांनी चालकाला बस थांबवली का नाही? असा जाब विचारला असता चालकाने खाली उतरून पिरजादे यांना अरेरावी करण्यास सुरुवात केली. तेव्हा पिरजादे यांनी याची तक्रार पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्याकडे करणार असल्याचे सांगताच चालकाने ‘काय करायचे ते तर कर, माझी मंत्री दिलीप कांबळे यांच्याशी ओळख आहे’ असे सांगत चालकाने पिरजादे यांना दम दिला.
त्यानंतर पुणे स्टेशन येथील बस थांब्यावर गाडी थांबली असता खाली उतरलेल्या पिरजादे यांची चालकाने गचांडी धरली आणि त्यांना मारहाण केली. तेथील नागरिकांनी मध्यस्थी करत दोघांनाही बाजुला केले.
त्यानंतर पिरजादे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात चालक आणि वाहकाच्या विरोधात तक्रार दिली असून याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. बेशिस्त कर्मचाºयांवर कारवाईचा बडगा उगारणारे पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष तुकाराम मुंढे दोघांवर कारवाई करणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: PMP striking the driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.