पीएमपी अधिक प्रवासीभिमुख करणार

By admin | Published: March 30, 2017 02:33 AM2017-03-30T02:33:10+5:302017-03-30T02:33:10+5:30

आधीच्या अधिकाऱ्यांनी घेतलेले चांगले निर्णय कायम ठेवून पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) बससेवा अधिक

The PMP will be more passenger-friendly | पीएमपी अधिक प्रवासीभिमुख करणार

पीएमपी अधिक प्रवासीभिमुख करणार

Next

पुणे : आधीच्या अधिकाऱ्यांनी घेतलेले चांगले निर्णय कायम ठेवून पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) बससेवा अधिक प्रवासीभिमुख करणे व कामकाजाला व्यावसायिक स्वरूप आणण्याला प्राधान्य देणार असल्याचे नवनियुक्त अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी सांगितले. त्यासाठी माहिती-तंत्रज्ञानाचा अधिक वापर करण्याचे संकेतही मुंढे यांनी दिले.
मुंढे यांनी बुधवारी दुपारी पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. पुण्यात विद्यार्थिदशेत असताना ‘पीएमपी’ने प्रवास केल्याची आठवणही त्यांनी या वेळी सांगितली. ‘पीएमपी’ची आर्थिक स्थिती, बस संचलन, बे्रकडाऊनचे प्रमाण, बससंख्या, प्रशासन तसचे इतर अडचणी काय आहेत, याचा अभ्यास करून अजेंडा ठरविला जाईल, असे सांगत मुंढे म्हणाले, नवी मुंबई पालिकेतील सार्वजनिक वाहतुकीचा अनुभव आहे. तिथे सुमारे ५०० बस असून सुमारे तीन लाख प्रवासी आहेत. तिथल्या बससेवेत चांगली प्रगती केली आहे. इथल्या परिस्थितीचा अभ्यास करावा लागेल. पण ही
संस्था व्यावसायिक दृष्टिकोनातून चालावी, असा प्रयत्न असेल. हे करताना उत्पन्न आणि खर्च या दोन बाबी महत्त्वाच्या आहेत, असेही मुंढे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

‘पीएमपी’ यापुर्वी राबविण्यात आलेली चांगली धोरणे पुढेही सुरूच ठेवली जातील. तसेच इतर वाहतुक यंत्रणांमधून चांगल्या गोष्टी मिळत असतील तर त्याचाही विचार केला जाईल. नवी मुंबईमध्ये काही गोष्टी चांगल्या होत्या. त्या इथे असतील तर चालु ठेवू, नसतील तर त्या आणल्या जातील. ही एक सुधारणेची प्रक्रिया आहे. प्रवाशांना चांगली सेवा देणे, हे आपले उद्दिष्ट आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी समजुन घ्यायला त्यांच्यात जायला मला काही अडचण वाटणार नाही, असे मुंढे यांनी सांगितले.

जगातल्या कोणत्याही शहरात वाहतुक ही मोठी समस्या आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतुक व्यवस्था कशी सक्षम करता येईल, हा महत्वाचा मुद्दा आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार आपण बससेवा पुरवू शकलो, तर निश्चितपणे आणि खासगी वाहने कमी करू शकतो. खासगी वाहने वाढण्यापेक्षा सार्वजनिक वाहतुक चांगली करण्याला सगळीकडे प्राधान्य दिले जाते. हे करताना प्रवासी केंद्रस्थानी असतील. ‘उबेर’ सारख्या सेवा आयटीचा अधिक वापर आणि मागणीनुसार पुरवठा होत असल्याने यशस्वी ठरल्या आहेत. याचा विचार केल्यास सार्वजनिक सेवाही मागणीवर आधारीत होऊ शकतात. तसा दृष्टीकोन ठरवून काम करावे लागेल. त्यासाठी कष्ट करावे लागतील. त्याला किती वेळ लागेल हे सांगु शकत नाही. पण त्यामध्ये सातत्यपुर्ण सुधारणा व्हायला हव्यात.
- तुकाराम मुंढे, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक
पुणे महानगर परिवहन महामंडळ

Web Title: The PMP will be more passenger-friendly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.