पुणे विमानतळावरून पीएमपीची पुन्हा धाव सुरु होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2020 12:04 AM2020-09-20T00:04:01+5:302020-09-20T00:04:46+5:30

प्रवासी तसेच तेथील कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी शहरातील पाच मार्गांवर बससेवा सुरू करण्याचे प्रस्तावित

PMP will start running from Pune airport again | पुणे विमानतळावरून पीएमपीची पुन्हा धाव सुरु होणार

पुणे विमानतळावरून पीएमपीची पुन्हा धाव सुरु होणार

Next
ठळक मुद्देपीएमपी अधिकाऱ्यांनी काही मार्गांचा अभ्यास करून पाच मार्गांचे केले नियोजन

पुणे : पुणे विमानतळावर ये-जा करणारे प्रवासी तसेच तेथील कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी शहरातील पाच मार्गांवर बससेवा सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये ही सेवा सुरू करण्याचे नियोजन असले प्रवाशांची मते जाणून घेतल्यानंतरच त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
पीएमपी बससेवा सुरू झाल्यानंतर विमानतळावरून बससेवा सुरू करण्याबाबत दोन्ही प्रशासनामध्ये प्राथमिक चर्चा झाली होती. त्यानंतर पीएमपी अधिकाऱ्यांनी काही मार्गांचा अभ्यास करून पाच मार्गांचे नियोजन केले आहे. त्यामध्ये विमानतळ ते हडपसर, स्वारगेट, कोथरूड, हिंजवडी आणि निगडी या ठिकाणांचा समावेश आहे. विमानतळ प्रवाशांसह मा र्गावर अन्य प्रवाशांचाही या मार्गांवर प्रतिसाद मिळेल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यानुसार विमानतळ प्रशासनाने शनिवारी या पाचही मार्गांची माहिती ट्विट करून प्रवाशांची मते जाणून घेण्यास सुरूवात केली आहे. प्रवाशांना बस सेवा सुरू करणे अपेक्षित असलेल्या मार्गांची माहिती विचारण्यात आली आहे.
दरम्यान, पीएमपीकडून विमानतळापासून हिंजवडी, कोथरूडसह अन्य काही मार्गांवर यापुर्वी एससी बससेवा सुरू करण्यात आली होती. पण या सेवेला प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. तिकीट जास्त असल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जात होती. तसेच मार्ग बदलण्याची मागणीही होत होती. आता नव्याने ही सेवा सुरू करण्याचा प्रयत्न असून बहुतेक मार्गांवर वातानुकूलित इलेक्ट्रिक बस सोडण्याचे नियोजन आहे. तसेच त्याचे तिकीट दरही नियमित बसप्रमाणेच असतील.
-------------
विमानतळापासून प्रस्तावित मार्ग
१. नगर रस्ता-चंदननगर, मगरपट्टा-हडपसर
२. कल्याणी नगर-वाडिया कॉलेज, सेव्हन लव्हज् चौक-स्वारगेट
३. पुणे स्टेशन-मनपा-डेक्कन जिमखाना-कोथरुड
४. पुणे स्टेशन-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ-वाकड पुल-हिंजवडी
५. विश्रांतवाडी-भोसरी-पिंपरी-निगडी
------------------
विमानतळावरून ऑक्टोबर महिन्यात बससेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. पण त्याआधी प्रवाशांची मते जाणून घेतली जाणार आहेत. त्यांच्याकडून मिळणाऱ्या प्रतिसादावर बस सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय होईल.
- राजेंद्र जगताप, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी
--------------
 

Web Title: PMP will start running from Pune airport again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.