‘पीएमपी बस प्रवाशांच्या तक्रारी ‘आरटीओ’कडून दुर्लक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 12:09 PM2019-09-10T12:09:37+5:302019-09-10T12:14:37+5:30

‘पीएमपी’ने तक्रारींची माहिती ‘आरटीओ’ला देणे तसेच ‘आरटीओ’कडून त्याची तपासणी करणे आवश्यक आहे.

pmpl bus passengers complaints ignored by 'RTO' | ‘पीएमपी बस प्रवाशांच्या तक्रारी ‘आरटीओ’कडून दुर्लक्षित

‘पीएमपी बस प्रवाशांच्या तक्रारी ‘आरटीओ’कडून दुर्लक्षित

googlenewsNext
ठळक मुद्देकायद्यातील तरतुदीपासून अनभिज्ञ : पीएमपीकडूनही दिली जात नाही माहितीतक्रार कक्षाक दर महिन्याला तब्बल १७०० ते १८०० तक्रारी बसविषयीच्या प्रवाशांच्या तक्रारींचा दखल घेणे आवश्यक

पुणे : ब्रेकडाऊन, प्रथमोपचार पेटी, अग्निशमन यंत्र नसणे, आसनांची दुर्दशा अशा अनेक प्रकारच्या तक्रारींचा पाऊस पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)वर पडत आहे. पण प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात आहे. मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार ‘पीएमपी’ने तक्रारींची माहिती ‘आरटीओ’ला देणे तसेच ‘आरटीओ’कडून त्याची तपासणी करणे आवश्यक आहे. पण याबाबत या दोन्ही यंत्रणा अनभिज्ञ आहेत. आतापर्यंत एकदाही ‘आरटीओ’कडून दैनंदिन तक्रारींची दखल घेतली नसल्याचे समोर आले आहे.
‘पीएमपी’कडे स्वतंत्र तक्रार निवारण यंत्रणा आहे. दुरध्वनी, मोबाईल, वॉट्सअप, ईमेल, लेखी अशा विविध माध्यमातून प्रवासी, नागरिकांना तक्रारी करता येतात. दर महिन्याला तब्बल १७०० ते १८०० तक्रारी तक्रार कक्षाकडे येत असतात. तक्रारी प्राप्त झाल्यानंतर प्रवाशांना त्यावर केलेली कार्यवाही ‘एसएमएस’द्वारे कळविली जाते. या तक्रारींमध्ये चालक व वाहकाचे वर्तन, ब्रेकडाऊन, प्रथमोपचार पेटी, अग्निशमन यंत्र नसणे, आसनांची दुर्दशा, बसची अनियमितता, मार्ग फलक नसणे, थांब्यावर न थांबणे, थांब्याची दुरावस्था, बसची दुरवस्था अशा विविध तक्रारींचा समावेश असतो. प्रामुख्याने बसच्या दुरावस्थेच्या तक्रारीच अनेक असतात. प्रवाशांचा प्रवास असुरक्षित होत असल्याच्या तक्रारीही प्रवाशांकडून केल्या जातात. 
कायद्यातील तरतुदीनुसार, संबंधित यंत्रणेने तक्रारींची योग्यप्रकारे नोंद ठेवणे, त्यावर कार्यवाही करणे आवश्यक आहे. तसेच ही नोंदवही आरटीओला पाठविणे, त्यावर आरटीओकडून त्याची तपासणी करणे गरजेचे आहे. या प्रक्रिया सातत्यपुर्ण असायला हवी. पण प्रत्यक्षात एकदाही तक्रार नोंदवहीची देवाणघेवाण झालेली नाही. पीएमपी प्रवासी मंचचे सतिश चितळे यांनी याबाबत आरटीओकडून माहिती अधिकारांतर्गत माहिती मागितली होती. पण काहीच माहिती उपलब्ध नसल्याचे त्यांना कळविले आहे. तसेच अपिलामध्येही आरटीओतील अधिकाºयांना कायद्यातील तरतुदीबाबत माहितीच नसल्याचे दिसून आले, असे चितळे यांनी सांगितले. 
............
‘आरटीओ’कडून बसला योग्यता प्रमाणपत्र दिले जाते. त्यामुळे त्यांनी बसविषयीच्या प्रवाशांच्या तक्रारींचा दखल घेणे आवश्यक आहे. पण यापूर्वी कधीही तक्रार नोंदवहीची दखल घेतली नाही. तसेच आरटीओकडे स्वतंत्रपणे तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. 
- संजय शितोळे, सचिव, पीएमपी प्रवासी मंच 
......
पीएमपी सेवेतील त्रुटी तसेच बसची अवस्था यासंदर्भात नागरिकांनी तीन वर्षात केलेल्या तक्रारींचा आढावा आरटीओकडून घेतला गेला असल्यास त्याचा तपशील मिळावा, अशी माहिती सतिश चितळे यांनी मागविली होती. त्यावर जनमाहिती अधिकारी व सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांनी ही माहिती ‘अभिलेखावर उपलब्ध नाही’ अशी माहिती दिली आहे.
 

Web Title: pmpl bus passengers complaints ignored by 'RTO'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.