यवत पर्यंत पीएमपीएलची बस धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:09 AM2020-12-08T04:09:41+5:302020-12-08T04:09:41+5:30

सुशांत दरेकर यांनी पीएमपीएलचे संचालक शंकर पवार यांच्याकडे बस सेवा यवत पर्यंत सुरू करण्याबाबत निवेदन सप्टेंबर महिन्यात दिले होते. ...

PMPL bus will run till Yavat | यवत पर्यंत पीएमपीएलची बस धावणार

यवत पर्यंत पीएमपीएलची बस धावणार

Next

सुशांत दरेकर यांनी पीएमपीएलचे संचालक शंकर पवार यांच्याकडे बस सेवा यवत पर्यंत सुरू करण्याबाबत निवेदन सप्टेंबर महिन्यात दिले होते. निवेदनातून दौंड तालुक्यातील सहजपुर , नांदूर , खामगाव , कासुर्डी व यवत या गावांमधून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी , कामगार ,वृद्ध व इतर नागरिक कामानिमित्त पुणे शहर येथे प्रवास करतात. परंतु, पुणे-सोलापूर महामार्गावर पीएमपीएलची बस सेवा उरुळी कांचनपर्यंत मर्यादीत आहे. ती यवत पर्यंत सुरू करण्याची मागणी केली होती.

काही वर्षांपूर्वी पीएमपीएलची बस सेवा यवत पर्यंत सुरू होती मात्र काही कारणास्तव बस सेवा बंद झाली होती. मागील काही वर्षात या भागात औद्योगिकीकरण वाढले.तुलनेने लोकसंख्या वाढत आहे.महामार्गावरून एस.टी. बसची सेवा लांब पल्ल्यातील प्रवशांसाठी जास्त प्रमाणात आहे.मात्र यवत पर्यंत जाण्यासाठी कामगार व शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. या सर्व बाबींचा विचार करता पीएमपीएलने बस सेवा यवत पर्यंत सुरू केल्यास नागरिकांचे हाल कमी होऊन अवैध वाहतुकीला आळा बसू शकतो.यवत पर्यंत बस सेवा सुरू करण्याची मागणी या अगोदर यवतच्या सरपंच राजिया तांबोळी यांनी देखील केली होती.यावेळी पीएमपीएलच्या व्यवस्थापनाकडून दरेकर यांच्या निवेदनाची दखल घेतल्याने यवत पर्यंतच्या प्रवस्यांना लवकरच बस सेवा सुरू होण्याची चिन्हे आहेत.

Web Title: PMPL bus will run till Yavat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.