PMPML: पीएमपी बसच्या धडकेत कोंढव्यातील ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 21:16 IST2023-06-30T21:15:11+5:302023-06-30T21:16:11+5:30
पीएमपी बसचालकाविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल...

PMPML: पीएमपी बसच्या धडकेत कोंढव्यातील ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
पुणे : पीएमपी बसची धडक बसून काेंढव्यातील ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. बिपीन जसवंतराव दवे (वय ७६, रा. कोंढवा) असे या आजाेबांचे नाव आहे. ते गुरुवारी सकाळी चालण्यासाठी गेले हाेते. कोंढव्यातील साळुंखे विहार रस्त्यावर सातच्या सुमारास रस्ता ओलांडत असताना हा अपघात झाला.
याप्रकरणी पीएमपी बसचालकाविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा नाेंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिपीन हे २९ जून रोजी सकाळी सातच्या सुमारास चालण्यासाठी साळुंखे विहार परिसरात जात होते. त्यावेळी रस्ता ओलांडत असताना भरधाव पीएमपी बसने त्यांना धडक दिली. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या बिपीन यांचा मृत्यू झाला. अधिक तपास पोलिस अंमलदार रासकर करत आहेत.