विद्यापीठात ‘पीएमपीएमएल’ बससेवा पुन्हा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:09 AM2021-07-01T04:09:49+5:302021-07-01T04:09:49+5:30
पीएमपीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप यांनी विद्यापीठाच्या विनंतीला मान्यता देत ही बससेवा सुरू केली. बससेवेची सुरुवात ...
पीएमपीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप यांनी विद्यापीठाच्या विनंतीला मान्यता देत ही बससेवा सुरू केली. बससेवेची सुरुवात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, अधिष्ठाता डॉ. संजीव सोनवणे, डॉ. मनोहर चासकर, अभिनेत्री गिरिजा ओक, समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. श्रुती तांबे, मराठी विभागप्रमुख डॉ. प्रभाकर देसाई तसेच बसचालक व वाहक उपस्थित होते.
विद्यापीठ ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व डेक्कन ते पुणे विद्यापीठ या दोन बस यावेळी सुरू करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोज या बसच्या चार फेऱ्या होणार आहेत, कालांतराने त्या वाढविण्यात येणार आहेत.
-------
पीएमपीच्या बस यापूर्वी विद्यापीठ गेटपर्यंत होत्या. मात्र, विद्यार्थी व कर्मचारी यांची मागणी लक्षात घेत या बससेवेची मागणी केली जात होती. यामुळे अनेकांचा विद्यापीठात येण्याचा प्रवास सुखकर होईल.
- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
-------