पीएमपीचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 02:14 PM2018-08-25T14:14:24+5:302018-08-25T14:26:41+5:30
निगडी ते कात्रज मार्गावरील पीएमपी बसचे बीअारटीचे दरवाजे उघडे हाेते, त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धाेका निर्माण झाला हाेता.
पुणे : पुणे शहराची एकमेव वाहतूक व्यवस्था असलेली पीएमपी या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. मार्गावर ब्रेकडाऊनचे प्रमाण कायम असतानाच अाज निगडीवरुनकात्रजला जाणाऱ्या बसेसचे बीअारटीचे दरवाजे उघडे असल्याने प्रवाशांच्या जीवाला धाेका निर्माण झाला हाेता. या बसमध्ये माेठ्याप्रमाणावर गर्दी असल्याने एखाद्याचा धक्का लागून चालत्या बसमधून काेणी पडले असते तर एखाद्याला अापला जीव गमवावा लागला असता. त्यामुळे पीएमपी प्रशासन बसेसची देखभाल दुरुस्ती वेळेवर करणार का असा प्रश्न प्रवासी विचारत अाहेत.
निगडीवरुनकात्रजकडे जाणारी 42 क्रमांकाच्या एका बसचे बीअारटीच्या बाजूला असणारे दरवाजे उघडे हाेते. निगडी ते कात्रज हा महत्त्वाचा मार्ग असल्याने या बसला गर्दी हाेती. बीअारटीचे दार उघडे असल्याने अनेक प्रवासी हे या दारांमध्ये उभे हाेते. काहीतर बाहेर डाेकावून सुद्धा पाहत हाेते. बस वेगात असताना एखाद्याचा धक्का लागून प्रवासी खाली पडला असता तर त्याचा जीव जाण्याची शक्यता हाेती. बस अनेकदा वेगात असताना खड्यात अादळते. किंवा स्पीड ब्रेकरवरुनही बस जाताना माेठे हादरे बसत असतात अशात हे दरवाजे उघडे असल्याने अपघात घडण्याची शक्यता अधिक हाेती. या दरवाज्यांच्या बाजूला काही तरुणीसुद्धा उभ्या हाेत्या. या बसमधील प्रवाशांना अापला जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत हाेता. पीएमपी बसेसची अनेकदा देखभाल याेग्य प्रकारे केली जात नाही. त्यातही खासगी कंत्राटदार हे बसेसच्या देखभालीकडे दुर्लक्ष करत असतात. त्यामुळे बसेस मार्गावर बंद पडणे. बीअारटीचे दरवाजे काम न करणे अशा अनेक समस्या राेज निर्माण हाेत असतात. त्यामुळे प्रवाशांना माेठा मनस्ताप सहन करावा लागत असताे. त्यातच इतर शहरांच्या तुलनेत प्रवासी भाडे अधिक असल्याने अनेक नागरिक हे स्वतःच्या वाहनाचा उपयाेग करतात.
पीएमपी प्रशासन एकीकडे नागरिकांना जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतूकीचा वापर करण्याबाबत अावाहन करत असते. तर दुसरीकडे प्रवाशांना याेग्य त्या साेयीसुविधा देण्यास कमी पडत असल्याचे चित्र अाहे. त्याचबराेबर धाेकादायक वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनांवर पाेलीस प्रशासन जशी कारवाई करत असते तशीच कारवाई पीएमपीवर करणार का असा सवालही अाता सर्वसामान्य विचारत अाहेत.