पीएमपीएमएलने बसपास दरवाढ रद्द करावी; प्रवासी मेळाव्यात विवेक वेलणकर यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:19 PM2017-11-20T12:19:17+5:302017-11-20T12:21:26+5:30

पीएमपीने अनधिकृतरीत्या केलेली बसपास दरवाढ  तत्काळ रद्द करून सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा द्यावा, असे मत सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी व्यक्त केले.

PMPML to cancel bus pass hike; Vivek Velankar's demand in the Pravasi Melava | पीएमपीएमएलने बसपास दरवाढ रद्द करावी; प्रवासी मेळाव्यात विवेक वेलणकर यांची मागणी

पीएमपीएमएलने बसपास दरवाढ रद्द करावी; प्रवासी मेळाव्यात विवेक वेलणकर यांची मागणी

Next
ठळक मुद्देपीएमपी बसपास दरवाढविरोधी स्वाक्षरी मोहीम आढावा व प्रवासी मेळावाविविध अकरा संघटनांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित

पुणे : पीएमपीने अनधिकृतरीत्या केलेली बसपास दरवाढ  तत्काळ रद्द करून सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा द्यावा, असे मत सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी व्यक्त केले. 
पीएमपी बसपास दरवाढविरोधी स्वाक्षरी मोहीम आढावा व प्रवासी मेळाव्यात ते बोलत होते. वेलणकर म्हणाले की, पीएमपी प्रशासनाने केलेली बसपास दरवाढ ही नियमाला धरून नाही. प्रशासनाचा हा निर्णय तुघलकी कारभाराचा नमुना आहे. हा दरवाढीचा प्रस्ताव महापालिका सभागृहात जेव्हा मांडला गेला, त्या वेळी कोणत्याच पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी त्याला विरोध केला नाही. पीएमपीच्या संचालक मंडळात सत्ताधारी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, एक प्रतिनिधी भाजपाचे आहेत. मात्र त्यांनीही या प्रस्तावाला विरोध केला नाही. यातून सत्ताधाऱ्यांची दुटप्पी भूमिका दिसून येते. या दरवाढीचा सर्वाधिक फटका ज्या लोकांचे हातावर पोट आहे असे मोलमजुरी करणाऱ्यांना व गरीब विद्यार्थ्यांना बसला आहे. याप्रकरणी नगरसेवकांना विचारल्यावर उडवाउडवीची उत्तरे देऊन मुख्य मुद्द्याला बगल देतात. पंचिंग पास बंद करण्याचे कारण देताना प्रशासन म्हणते, की तो इतर कुठेच चालत नसल्याने बंद करण्यात आला असे हास्यास्पद कारण दिले जाते. या दरवाढीला पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढेच जबाबदार नसून याप्रकरणात बघ्याची भूमिका घेणाऱ्या सत्ताधाऱ्यांसह, विरोधी नगरसेवकही तितकेच जबाबदार आहेत.  
सजग नागरिक मंच, लोकायत, जनवादी महिला संघ, भगतसिंग युवा मंच, जाणीव संघटना, नागरी चेतना या संघटनांसह विविध अकरा संघटनांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते. 
लोकायतचे निश्चय म्हात्रे यांनी सांगितले, पीएमपी प्रवासी मंचातर्फे मागील पंधरा दिवसांत या बसपास दरवाढीविरोधात शहराच्या विविध भागांतून नागरिकांच्या सह्यांचे १० हजार फॉर्म जमा केले गेले. अजूनही ही मोहीम चालू असणार आहे. 
येत्या काळात एक लाख सह्यांचे फॉर्म पीएमपीच्या प्रशासनाला सादर करून प्रवाशांचा विरोध दाखवून देऊ. प्रशासनाने यावर त्वरित तोडगा काढावा व ही दरवाढ बंद करून पूर्वीचे पासदर ठेवावे. अन्यथा येत्या काळात ही मोहीम अधिक तीव्र केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. 
शहराच्या महत्त्वाच्या मार्गावरील बससेवा मोफत देऊ असे महापालिका निवडणूक जाहीरनाम्यात सांगणारे सत्ताधारी आता सोईस्करपणे आपल्याच वचनाकडे दुर्लक्ष करतात असे ते म्हणाले.  

Web Title: PMPML to cancel bus pass hike; Vivek Velankar's demand in the Pravasi Melava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे