PMPML | पीएमपीएमएल ठेकेदारांचा संप अखेर मागे; प्रवाशांना मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 07:21 PM2023-03-07T19:21:10+5:302023-03-07T19:22:31+5:30

या संपाचा सुमारे विद्यार्थी, नोकरदार यांच्यासह सात ते आठ लाख प्रवाशांना फटका बसला होता...

PMPML contractors strike finally called off; A big relief for passengers | PMPML | पीएमपीएमएल ठेकेदारांचा संप अखेर मागे; प्रवाशांना मोठा दिलासा

PMPML | पीएमपीएमएल ठेकेदारांचा संप अखेर मागे; प्रवाशांना मोठा दिलासा

googlenewsNext

पुणे :पीएमपीएमएल’च्या चार ठेकेदाराचे गेल्या तीन महिन्यांच्या बिलापोटीचे ६६ कोटी मिळाल्यानंतर सोमवारी रात्री संप मागे घेतला. या संपाचा सुमारे विद्यार्थी, नोकरदार यांच्यासह सात ते आठ लाख प्रवाशांना फटका बसला. संप मिटल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पीएमपीएमएल’च्या ओलेक्ट्रा, ट्रॅव्हल टाइम, अँथनी व हंसा या चार ठेकेदारांचे चार महिन्यांचे ९९ कोटी रुपयांची बिले थकल्याने रविवारी दुपारपासून त्यांनी संप सुरू केला. संपात सुमारे ९०७ बस सहभागी झाल्याने रविवारी व सोमवारी मोठ्या प्रमाणात ‘पीएमपीएमएल’ची सेवा विस्कळीत झाली होती. त्यानंतर पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेने ९० कोटी रुपये पीएमपीएमएल प्रशासनाला दिले. यात पुणे महापालिकेने ५४ कोटी, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेने ३६ कोटी रुपये दिले. त्यापैकी या चार ठेकेदारांचे ६६ कोटी रुपये देण्यात आले, तर २४ कोटी रुपये हे 'एमएनजीएल'चे देण्यात येणार आहे. ठेकेदारांचे नोव्हेंबर ते फेब्रुवारी असे चार महिन्यांचे बिल थकले होते. यापैकी नोव्हेंबर ते जानेवारी असे तीन महिन्यांचे बिल देण्यात आले.

पीएमपीएमएलची बससेवा पूर्ववत व्हावी, याकरिता सोमवारी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पीएमपीएमएलचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांची भेट घेऊन चर्चा केली. यात आमदार रवींद्र धंगेकर, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख, संतोष नांगरे आदींनी देखील भेट घेऊन संपावर तोडगा काढण्याची मागणी केली होती.

वेतन थकल्याने चार ठेकेदारांनी संप केला होता. सोमवारी थकीत रकमेतील ६६ कोटी रुपये देण्यात आले. पीएमपीएमएलची बससेवा पूर्ववत झाली आहे.

- ओमप्रकाश बकोरिया, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे

Web Title: PMPML contractors strike finally called off; A big relief for passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.