पीएमपीएमएलचे संचालक शंकर पवार यांचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:12 AM2021-05-27T04:12:16+5:302021-05-27T04:12:16+5:30

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) संचालक शंकर पवार यांनी बुधवारी आपला संचालक पदाचा राजीनामा भाजप शहराध्यक्ष जगदीश ...

PMPML director Shankar Pawar resigns | पीएमपीएमएलचे संचालक शंकर पवार यांचा राजीनामा

पीएमपीएमएलचे संचालक शंकर पवार यांचा राजीनामा

googlenewsNext

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) संचालक शंकर पवार यांनी बुधवारी आपला संचालक पदाचा राजीनामा भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्याकडे सादर केला आहे. शहर भाजपने इतर पदाधिकाऱ्यांच्या बदलाप्रमाणेच पीएपीएमएलच्या संचालकपदीही इतरांना संधी देण्यासाठी हा राजीनामा घेतले गेला असल्याचे बोलले जात आहे.

पवार यांच्या या राजीनाम्यामुळे महापालिकेत एकहाती सत्ता असलेल्या भाजपकडून येत्या जून महिन्याच्या मुख्य सभेत पीएमपीएमएलच्या संचालकपदी नवी नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, स्थायी समिती अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्यांपैकीच कोणाची तरी वर्णी या पदावर लागेल असे बोलले जात आहे.

पीएमपीएमएलच्या संचालकपदी भाजपकडून डिसेंबर २०१९ मध्ये पवार यांची संचालकपदी नेमणूक करण्यात आली होती. त्यांचा वर्षभराचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते; परंतु पालिकेतील पदाधिकारी कायम राहिल्याने पवार यांनीही राजीनामा देण्यास नकार दिला होता. आजअखेर पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा शहराध्यक्ष मुळीक यांच्याकडे सादर केला आहे.

--------------------------

Web Title: PMPML director Shankar Pawar resigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.