Pune News | गरवारे, नळ स्टॉप स्टेशनला आजपासून पीएमपीची फिडर सेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 08:01 AM2022-03-21T08:01:31+5:302022-03-21T08:03:26+5:30
सोमवारपासून पुण्यात दोन व पिंपरी-चिंचवडच्या चार मेट्रो स्टेशनला फिडर सेवा सुरू होत आहे...
पुणे:पुणे व पिंपरी-चिंचवड स्टेशनला सोमवारपासून पीएमपी फिडर (pmpml) सेवा सुरू करत आहेत. पुण्यात गरवारे (garware metro station) व नळ स्टॉपला (nal stop metro station) ही सेवा सुरू होणार आहे. त्याचे तिकीट दर १० ते १५ रुपये असेल, तर फिडर सेवेचे दिवसभरातला २० फेऱ्या होतील. २० मिनिटाच्या अंतराने फिडर सेवेतील बस मेट्रो स्टेशनसाठी धावतील. सोमवारी दुपारी बारा वाजता व्यवस्थापकीय संचालक डॉ. लक्ष्मीनारायण मिश्रा व मेट्रोच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थित ही सेवा सुरू होत आहे.
मेट्रोची सेवा सुरू झाल्यानंतर त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. त्यामळे पीएमपी प्रशासनाने मेट्रो स्टेशनला जोडणाऱ्या फिडर सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला गरवारे महाविद्यालय व नळस्टॉपसाठी ३२ आसनी दोन बस धावतील. या बसच्या दिवसभरातून २० फेऱ्या होणार आहेत. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभला तर आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या बस दर २० मिनिटांच्या फरकाने धावणार आहेत.
सोमवारपासून पुण्यात दोन व पिंपरी-चिंचवडच्या चार मेट्रो स्टेशनला फिडर सेवा सुरू होत आहे. सुरुवातीला दिवसातून २० फेऱ्या होतील. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून बसच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला जाईल.
- लक्ष्मीनारायण मिश्रा, अध्यक्ष, तथा व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी