PMPML: जागतिक महिला दिनी महिलांना ‘पीएमपी’चा मोफत प्रवास, १७ मार्गावर विशेष बस
By भाग्यश्री गिलडा | Published: March 6, 2024 06:07 PM2024-03-06T18:07:11+5:302024-03-06T18:08:03+5:30
पीएमपीकडून खास महिलांसाठी १७ मार्गावर विशेष बस साेडण्यात येणार आहेत....
पुणे : जागतिक महिला दिनानिमित्त शुक्रवारी (दि. ८) पुण्यातील महिलांना पीएमपीने मोफत प्रवास करता येणार आहे. यासाठी पीएमपीकडून खास महिलांसाठी १७ मार्गावर विशेष बस साेडण्यात येणार आहेत.
कोणत्या मार्गांवर महिलांना मोफत प्रवास?
३०१ - स्वारगेट ते हडपसर
११७ - स्वारगेट ते धायरेश्वर मंदिर
१६९ - शनिवारवाडा ते केशवनगर मुंडवा
९४ - कोथरूड डेपो ते पुणे स्टेशन
८२ - एनडीए गेट क्र. १० ते मनपा
२४ - कात्रज ते महाराष्ट्र हौसिंग बोर्ड
१०३ - कात्रज ते कोथरूड डेपो
६४ - हडपसर ते वारजे माळवाडी
१११ - भेकराईनगर ते मनपा
१६७ - हडपसर ते वाघोली
१३ - अप्पर डेपो ते शिवाजीनगर
११ - मार्केटयार्ड ते पिंपळेगुरव
१७० - पुणे स्टेशन ते कोंढवा खुर्द
३२२ - आकुर्डी रेल्वे स्टेशन ते मनपा
३७२ - निगडी ते मेगा पॉलिस हिंजवडी
३६७ - भोसरी ते निगडी
३५५ - चिखली ते डांगे चौक