PMPML | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुणे शहरात गुरुवारी रात्रभर बससेवा
By निलेश राऊत | Updated: April 11, 2023 14:31 IST2023-04-11T14:31:00+5:302023-04-11T14:31:36+5:30
पहाटे पाचपर्यंत स्वारगेट ते पुणे स्टेशन अशी रात्रभर बससेवा उपलब्ध राहणार...

PMPML | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुणे शहरात गुरुवारी रात्रभर बससेवा
पुणे : डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी, पुणे स्टेशन येथे येणाऱ्या भाविकांसाठी गुरूवारी रात्री (दि.१३) १० ते पहाटे पाचपर्यंत स्वारगेट ते पुणे स्टेशन अशी रात्रभर बससेवा उपलब्ध राहणार आहे.
पीएमपीएमएल (पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.) ने दिलेल्या माहितीनुसार, पुणे स्टेशनजवळील जिल्हाधिकारी चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी मोठी गर्दी होते. यामुळे सदर दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्थानक, ससून रोड व मोलेदिना बस स्थानक येथून सुटणाऱ्या बस पुणे स्टेशन स्थानकावरून सोडण्यात येणार आहेत. तर परतीच्या वेळी येणाऱ्या बस बंडगार्डन कडून येताना वाडीया कॉलेज, अलंकार चौक व पेटीट बस स्थानक येथे थांबणार आहेत. हा बदल वाहतुक पोलीसांच्या सूचनानुसार करण्यात आला असल्याचे पीएमपीएमएलने कळविले आहे.