PMPML: पीएमपीकडून एक बसमार्ग पूर्ववत, तीन बसमार्गांचा विस्तार व एका बसमार्गामध्ये बदल
By नितीश गोवंडे | Published: May 24, 2023 05:08 PM2023-05-24T17:08:03+5:302023-05-24T17:10:02+5:30
धनकवडी ते शिवाजीनगर मार्ग पूर्ववत सुरू होणार....
पुणे :पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून प्रवाशांच्या मागणीनुसार बसमार्ग क्र. २६ – धनकवडी ते शिवाजीनगर (मार्गे- स्वारगेट, टिळक रोड, डेक्कन जिमखाना, फर्ग्युसन रोड) हा बसमार्ग पूर्ववत सुरू करण्यात येत आहे. तसेच बसमार्ग क्र. ५०, ८८ व ३७६ या तीन बसमार्गांचा विस्तार करण्यात येत आहे. याचबरोबर बसमार्ग क्र. ३११ – पिंपरीगाव ते पुणे स्टेशन या मार्गात बदल करून मोरवाडी चौक, मासुळकर कॉलनी, वायसीएम हॉस्पिटल, खडकी बाजार मार्गे करण्यात येत आहे. हे सर्व बदल उद्यापासून लागू होणार असल्याची माहिती पीएमपी प्रशासनातर्फे देण्यात आली.
बसमार्गांचा तपशील खालीलप्रमाणे..
- मार्ग क्रमांक २६ – धनकवडी ते शिवाजीनगर
मार्गे - स्वारगेट, टिळक रोड, डेक्कन जिमखाना, फर्ग्युसन रोड
बस संख्या – २
वारंवारिता – ५५ मिनिटे
- मार्ग क्रमांक ५० – शनिवारवाडा ते सिंहगड पायथा
या मार्गाचा विस्तार स्वारगेटच्या पुढे शनिवार वाड्यापर्यंत करण्यात आला आहे.
बस संख्या – ४
वारंवारिता – ५० मिनिटे
- मार्ग क्रमांक ८८ – अप्पर ते मेडी पॉईंट
या मार्गाचा विस्तार स्वारगेटच्या पुढे अप्पर डेपो पर्यंत करण्यात आला आहे.
बस संख्या – २
वारंवारिता – १ तास १० मिनिटे
- मार्ग क्रमांक ३७६ – मनपा भवन ते पिंपरीगाव
या मार्गाचा विस्तार मासुळकर कॉलनी च्या पुढे पिंपरी गाव पर्यंत करण्यात आला आहे.
बस संख्या – २
वारंवारिता – १ तास ३० मिनिटे
- मार्ग क्रमांक ३११ – पिंपरीगाव ते पुणे स्टेशन
या मार्गात बदल करून मोरवाडी चौक, मासुळकर कॉलनी, वायसीएम हॉस्पिटल, खडकी बाजार मार्गे
करण्यात आला आहे.
बस संख्या – २
वारंवारिता – १ तास ३० मिनिटे