पीएमपीच्या पाट्यांना मिळेना हक्काची जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 09:06 PM2018-04-24T21:06:42+5:302018-04-24T21:06:42+5:30

पीएमपीचा मार्ग दर्शविणाऱ्या पाट्या याेग्य ठिकाणी लावणे अपेक्षित असताना, त्या कुठेही लावण्यात येत असल्याचे चित्र अाहे. त्यामुळे प्रवाशांना खासकरुन रात्रीच्या वेळी कुठल्या मार्गावरील बस अाहे हे कळण्यास अडचण येत अाहे.

pmpml sign boards are not on the mark | पीएमपीच्या पाट्यांना मिळेना हक्काची जागा

पीएमपीच्या पाट्यांना मिळेना हक्काची जागा

googlenewsNext

पुणे : पीएमपीचा मार्ग सांगणाऱ्या पाट्या प्रवाशांना दिसतील अशा जागी लावणे अपेक्षित आहे. त्याचबराेबर त्या पाट्यांवर रात्रीच्यावेळी प्रकाश असणे सुद्धा अावश्यक अाहे. परंतु पीएमपीच्या बहुतांश बसेसच्या पाट्या या खाली बसच्या काचेच्या येथे लावण्यात येतात. त्याचबराेबर त्यावर रात्रीच्यावेळी प्रकाशही नसताे. त्यामुळे प्रवाशांना रात्रीच्यावेळी कुठल्या मार्गावरील बस अाहे हे समजणे अवघड जात असल्याचे चित्र अाहे. 
    पीएमपी ही पुण्यातील एकमेव सार्वजनिक वाहतूक सेवा असल्यामुळे माेठ्याप्रमाणावर प्रवासी पीएमपीने प्रवास करीत असतात. सुरुवातीपासूनच सक्षम वाहतूक व्यवस्था पुरविण्यात पीएमपी प्रशासन कमी पडत असल्याचे चित्र अाहे. मधल्या काळात तुकाराम मुंडे यांनी ही व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न केला हाेता. परंतु अाता पुन्हा परिस्थिती बदलत असल्याचे चित्र अाहे. बस ज्या मार्गावर धावत अाहे, त्या मार्गाची पाटी हि प्रवाशांना दिसेल अश्या भागात लावणे अपेक्षित अाहे. त्याचबराेबर रात्रीच्यावेळी त्यावर प्रकाश असणे गरजेचे अाहे. जेणेकरुन प्रवाशांना बस कुठली अाहे हे कळण्यास मदत हाेईल. परंतु पीएमपीच्या अनेक जुन्या बसेसच्या पाट्या या चालकाच्या शेजारील काचेच्या येथे खालच्या भागात लावण्यात येत असल्याने प्रवाशांना कुठल्या मार्गावरील बस अाहे हे समजणे अवघड जात अाहे. खासकरुन रात्रीच्यावेळी कुठली बस अाहे हे लांबून कळत नाही. बस जवळ अाल्यानंतर त्यावरील पाटी वाचता येते. अनेकदा बसवरील पाटी अंधारात वाचता येत नसल्याने प्रवासी बसच्या समाेर येत असतात. त्यामुळे अपघात हाेण्याची शक्यता अाहे. तसेच अनेकदा कुठली बस अाहे हे कळत नसल्याने बस चुकण्याचेही प्रकार घडत असतात. 
    याबाबत बाेलताना रुपा भुतके ही तरुणी म्हणाली, अनेक बसेसच्या पाट्या या खालच्या भागात लावण्यात येत असल्याने त्या पटकन दिसत नाही. या पाटीवर लाईटही नसते. तसेच बसच्या प्रखर लाईटमुळे ही पाटी वाचताही येत नाही. त्यामुळे बस जवळ अाल्याशिवाय ती कुठल्यामार्गावरील बस अाहे हे समजत नाही. बसवरील पाटी वाचता न अाल्याने अनेकदा बस चुकली अाहे. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने याेग्य ठिकाणी पाटी लावून त्यावर लाईट लावायला हवी. नाव न छापण्याच्या अटीवर पीएमपीचे एक वरिष्ठ अधिकारे म्हणाले, नव्या बसेसला एलईडी स्क्रीन असल्याने त्यांच्या पाट्यांचा प्रश्न येत नाही. ज्या बसेसला एलईडी स्क्रीन नाही त्या बसेसच्या पाट्यांवर अाम्ही येत्या काळात लाईट लावण्याची व्यवस्था करणार अाहाेत. तसेच जे चालक एलईडी स्क्रीन सुरु करत नाहीत त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार अाहे. 

Web Title: pmpml sign boards are not on the mark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.