पीएमपीएमएलच्या पास दरात कपात, तिकीट दरवाढही रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:12 AM2021-09-03T04:12:04+5:302021-09-03T04:12:04+5:30

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.च्या (पीएमपीएमएल) संचालक मंडळाच्या बैठकीत दैनंदिन आणि मासिक पास दरात कपात करण्याचा ...

PMPML's pass rate cut, ticket price hike also canceled | पीएमपीएमएलच्या पास दरात कपात, तिकीट दरवाढही रद्द

पीएमपीएमएलच्या पास दरात कपात, तिकीट दरवाढही रद्द

Next

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.च्या (पीएमपीएमएल) संचालक मंडळाच्या बैठकीत दैनंदिन आणि मासिक पास दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, याची अंमलबजावणी येत्या ७ सप्टेंबरपासून केली जाणार आहे़ तसेच तिकीट दरवाढ करण्याचा पीएमपीएमएल प्रशासनाचा निर्णयही रद्द करण्यात आला असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाची बैठक गुरुवारी पार पडली. यात महापौर मोहोळ यांच्यासह पिंपरी-चिंचवडच्या महापौर माई ढोरे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, पिंपरी-चिंचवड मनपाचे स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, पीएमपीएमएल अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा, मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, संचालक प्रकाश ढोरे आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर महापौर मोहोळ यांनी याबाबत माहिती दिली असून, पुणेकरांनी शहरांतर्गत प्रवासासाठी पीएमपीएमएल बसचा अधिकाधिक वापर करावा, यासाठी पासेसच्या दरात सवलतीचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले़ या निर्णयाबरोबरच पीएमपीएमएलच्या मिळकतींवर सौरऊर्जा प्रकल्प राबवण्याच्या निर्णयालाही मान्यता देण्यात आली असून, मिळकती व्यापारी तत्त्वावर विकसित करण्यासाठी 'व्हिजिबलिटी स्टडी रिपोर्ट' करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे़ पीएमपीएमएलकडे मोठ्या प्रमाणात असलेल्या दहावर्षांवरील डिझेल बसेसचे रूपांतर इलेक्ट्रिक किंवा सीएनजीमध्ये करण्याबाबत संबंधित संस्थेकडून अहवाल तयार करण्यासही यावेळी मंजुरी देण्यात आली आहे़

----------------------------

चौकट

असे असतील नवे दर !

* दैनिक सामान्य पास

एका मनपा हद्दीत : ४० रुपये

दोन्ही मनपा हद्दीत : ५० रुपये

मनपा हद्दीबाहेरसह : ७० रुपये

---

मासिक पास- सामान्य

एका मनपा हद्दीत : ९०० रुपये

दोन्ही मनपा हद्दीत : १२०० रुपये

मनपा हद्दीबाहेरसह : १४०० रुपये़

------------------------------

Web Title: PMPML's pass rate cut, ticket price hike also canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.