पीएमपीच्या खिळखिळ्या बस आणि प्रवासी गर्दीने चालक, वाहक बेजार    

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 06:00 AM2019-02-04T06:00:56+5:302019-02-04T06:05:01+5:30

अपेक्षित बस, उत्पन्न, प्रवाशांचे उद्दिष्ट गाठणे शक्य होत नसल्याने या कर्मचाऱ्यांवर सतत कारवाईची टांगती तलवार आहे.

PMP's bus driver, carrier in troubles due to problematic buses and passengers | पीएमपीच्या खिळखिळ्या बस आणि प्रवासी गर्दीने चालक, वाहक बेजार    

पीएमपीच्या खिळखिळ्या बस आणि प्रवासी गर्दीने चालक, वाहक बेजार    

Next
ठळक मुद्देपीएमपीच्या सेवेत सुमारे ६५०० ते ७००० हजार चालक व वाहक बसला आग लागण्याच्या प्रकारांमुळे चालकांवरील ताण आहे वाढला

पुणे : देखभाल दुरुस्तीच्या अभावामुळे सतत नादुरुस्त होणाऱ्या बस, पुरेशा बस उपलब्ध नसणे, प्रवाशांची गर्दी, कामाचा ताण अशा विविध कारणांमुळे पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) तील चालक, वाहक व वर्कशॉपमधील कर्मचारीही बेजार झाले आहेत. अपेक्षित बस, उत्पन्न, प्रवाशांचे उद्दिष्ट गाठणे शक्य होत नसल्याने या कर्मचाऱ्यांवर सतत कारवाईची टांगती तलवार आहे.
पीएमपीच्या सेवेत सुमारे ६५०० ते ७००० हजार चालक व वाहक आहेत. यातील काही वाहक ठेकेदाराकडील बसवर असतात. तर या बसवर ठेकेदारांचेच चालक असतात. स्वारगेट येथील मुख्यालयातील मुख्य वर्कशॉपसह बहुतेक आगारामध्ये एक वर्कशॉप आहे. या वर्कशॉपमध्ये दीड ते दोन हजार कर्मचारी काम करतात. या सर्व कर्मचाऱ्याना निश्चित वेळेनुसार काम दिले जाते. चालक व वाहकांना दररोज किमान दोन ते आठ बस फेऱ्या कराव्या लागतात. मार्गाच्या अंतरानुसार या फेऱ्या निश्चित केल्या जातात. पण मागील काही वर्षांपासून देखभाल-दुरूस्ती व्यवस्थित होत नसल्याने  ब्रेकडाऊन मधील सातत्य कायम आहे. त्यामुळे अनेकदा चालकांना सर्व फेºया पुर्ण करता येत नाहीत. नवीन मिडी बस वगळता पीएमपीच्या मालकीच्या बहुतेक बस खिळखिळ्या झाल्या आहेत. या बस घेऊनच चालक व वाहकांना रोजचा दिवस काढावा लागत आहेत. याबाबत काही चालक व वाहकांनी लोकमत शी संवाद साधत त्यांना येणाºया अडचणींचा पाढा वाचला.
कामावर आल्यानंतर चालकाच्या ताब्यात बस दिली जाते. ही बस रस्त्यावर आणण्यासाठी फिट असल्याचे नमुद केलेले असते. पण प्रत्यक्षात चालक जेव्हा मार्गावर जातो त्यावेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. इंजिन गरम होणे, ब्रेक, क्लच, स्टेअरिंग व्यवस्थित काम न करणे, बस पिकअप न घेणे यांसह काचा नसणे, बसमध्ये अस्वच्छता, सीट तुटलेल्या असणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो. बसच्या या अवस्थेमुळे अनेकदा चालक व वाहकांना प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागते. बस बंद पडल्यानंतर तर हा रोष आणखी वाढतो. काही प्रवासी शिवीगाळही करतात. पण त्यांनाही दोष देता येत नाही. फेºया वेळेत पुर्ण न केल्यास, अपेक्षित प्रवासी संख्या नसल्यासही वरिष्ठांची बोलणी खावी लागतात. कधी कधी कारवाईलाही सामोरे जावे लागते, अशी व्यथा एका चालकाने सांगितली. 
..................
बसला आग लागण्याच्या प्रकारांमुळे चालकांवरील ताण वाढला आहे. अनेक बस जुन्या असल्याने कधी बंद पडतील, कधी कुठून धुर येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे सतत तणावाखाली राहावे लागते. लांबपल्यासाठीही अनेकदा जुन्या गाड्या दिल्या जातात. या गाड्यांना अपेक्षित वेग नसतो. ब्रेक, गिअरच्या अडचणी असतात. पण पर्याय नसल्याने रडतखडत फेºया पुर्ण करतो, असे एका चालकाने सांगितले.बस बंद पडल्यानंतर चालक व वाहकांना कामाच्या वेळेपेक्षा जास्त वेळ थांबावे लागते. बंद बस नेण्यासाठी लवकर व्यवस्था होत नाही. तासनतास ताटकळत थांबावे लागते. रस्त्यातच बस बंद पडल्यास इतर वाहन चालकांचा राग सहन करावा लागतो. कधी-कधी पोलिस कारवाई होते. बस पार्किंगचीही मोठी समस्या आहे.
- एक चालक ...
..................................
गर्दी होते डोईजड
मार्गावर बस अपुºया असल्याने सकाळी व सायंकाळी प्रवाशांची मोठी गर्दी होते. अनेकदा ८० हून अधिक प्रवासी बसमध्ये असतात. अशावेळी गदीर्तून प्रत्येक प्रवाशापर्यंत पोहचणे कठीण होते. उभे राहायलाही जागा नसते. महिला वाहकांना याचा खुप त्रास होतो. या गदीर्चा काही प्रवासी गैरफायदा घेऊन तिकीट घेत नाहीत. पुढे तपासणी झाल्यास त्याचा भुर्दंड वाहकांना सहन करावा लागतो. अशावेळी स्थानकांवरच बुकींगची सुविधा असणे गरजेचे आहे. नियमित बस असल्यास ही समस्या येणार नाही.
- एक वाहक
.......................
काहीवेळा आगारातून बस वेळेत उपलब्ध होत नाहीत. उशिरा बस दिल्यानंतरही फेºया पुर्ण करण्याची ताकीद दिली जाते. बसची पुरेशी दुरूस्ती नसतानाच बस दिल्या जातात. काही वरिष्ठांकडून त्यासाठी दबाव टाकला जातो, असे चालकांनी सांगितले.
.............................
जुन्या गाड्या अन् सुट्या भागांची कमतरता 
अधिकाधिक बस मार्गावर आणण्यासाठी वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांवर सतत ताण असतो. पण अनेक गाड्या जुन्या असल्याने तसेच काही वेळा सुट्टे भाग वेळेवर मिळत नसल्याने जुन्या साहित्यावर काम करावे लागते. परिणामी, मार्गावरच बस बंद पडते. जुन्या बसला किती दिवस मुलामा देणार? काही बसच्या इंजिन व इतर भागांची क्षमता संपली आहे. त्यामुळे त्याचे देखभाल-दुरूस्ती करूनही उपयोग होत नाही. पण त्याचा रोष वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांवर निघतो, असे वर्कशॉपमधील एका कर्मचाऱ्याने सांगितले.चालक, वाहक व वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण आहे. बसची संगणकीकृत तपासणी करण्याची घोषणा प्रत्यक्षात आलेली नाही. त्यामुळे बस दुरूस्ती योग्यप्रकार होत नाही. याचा ताण कर्मचाऱ्यांवर येतो. काहीवेळा कारवाईला सामोरे जावे लागते.
- राजेंद्र खराडे, अध्यक्ष
पीएमपी इंटक

Web Title: PMP's bus driver, carrier in troubles due to problematic buses and passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.