पीएमपीचे सर्वच मार्ग तोट्यात, प्रतिकिलोमीटर खर्च साधारणपणे ८० रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2019 01:10 PM2019-07-08T13:10:19+5:302019-07-08T13:12:58+5:30
पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) सर्वच बस मार्ग तोट्यात असल्याचे समोर आले आहे.
राजानंद मोरे
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) सर्वच बस मार्ग तोट्यात असल्याचे समोर आले आहे. पीएमपीचा प्रतिकिलोमीटर खर्च साधारणपणे ८० रुपये एवढा होता. पण बहुतेक मार्गांचे उत्पन्न त्याच्या जवळपासही पोहचत नाही. मे महिन्याच्या आकडेवारीनुसार केवळ एकच मार्ग सर्वाधिक ७१ रुपये उत्पन्न मिळविणारा आहे.
पीएमपीच्या ताफ्यात सुमारे २ हजार बस असून त्यापैकी दररोज सुमारे १४०० ते १५०० बस मार्गावर धावतात. जवळपास ५०० बस विविध कारणांनी मार्गावर येत नाहीत. मार्गावर आलेल्या बसपैकी सुमारे १५० बसचे ब्रेकडाऊन होते. तसेच वाहतुक कोंडी, चालक-वाहकांअभावी काही फेºया रद्द कराव्या लागतात. त्यामुळे प्रवाशांना मार्गावर पुरेशा बस उपलब्ध होत नाहीत. परिणामी पीएमपीला अपेक्षित उत्पन्नही मिळत नाही. प्रशासनाने पीएमपीचा प्रति किलोमीटर खर्च ८० रुपये निश्चित केला आहे. यामध्ये इंधन खर्च, प्रशासकीय खर्च व इतर सर्व खचार्चा समावेश आहे. पण प्रत्यक्षात एकाही बसमागार्चे प्रति किलोमीटर उत्पन्न त्याच्या जवळपासही नाही.
पीएमपीचे सुमारे ३५० बस मार्ग आहेत. मे महिन्यातील आकडेवारीनुसार या मार्गांपैकी पुणे स्टेशन ते वाघोली या मार्गावरील बसचे प्रति किलोमीटर उत्पन्न सर्वाधिक ७१ रुपये मिळाले आहे. या एकमेव मागार्चे उत्पन्न ७० रुपयांचे पुढे आहे. तर कात्रज ते शिवाजीनगर, कात्रज ते निगडी यांसह अन्य काही मार्गांचे उत्पन्न ६० ते ६५ रुपयांदरम्यान आहे. इतर सर्वच मार्गांचे उत्पन्न ६० रुपयांपेक्षा कमी असल्याचे आकडेवारीवरून दिसते. प्रत्यक्षात प्रतिकिलोमीटर खर्च ८० रुपये असताना एकाही मागार्चे उत्पन्न त्याच्या जवळपासही पोहचत नसल्याने पीएमपीला दररोज लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. स्वारगेट आगारातील बसची मार्च महिन्यातील धाव सुमारे ७ लाख ९१ हजार एवढी होती. प्रति किलोमीटर सरासरी २० रुपये तोटा पकडला तरी पीएमपीचा तोटा एका आगाराचा एका महिन्यातील तोटा दीड कोटींपेक्षा जास्त झाला. त्यामुळे 'पीएमपी 'चा वार्षिक तोटा मागील आर्थिक वर्षात २४४ कोटींवर पोहचला आहे. आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये हा तोटा २०४ कोटी एवढा होता. त्यामध्ये तब्बल ४० कोटींची वाढ झाली आहे. तर चालु आर्थिक वषार्तील तोटाही पावणे तिनशे कोटींवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
-------------------
पीएमपीचा प्रति किलोमीटर खर्च (सीपीके) - ८० रुपये
सर्वाधिक उत्पन्न असलेला मार्ग (मे महिन्यातील) - पुणे स्टेशन ते वाघोली (७१ रुपये)पीएमपीचे अनेक मार्ग एकुण खर्चाच्या निम्मेही उत्पन्न मिळविणारे नाहीत. काही मार्गांचे उत्पन्न तर २५ ते ३० रुपयांपर्यंतच आहेत. त्यामुळे या मार्गांची पुर्नरचना करण्याचा विचार पीएमपी प्रशासनाकडून केला जात आहे. तर काही मार्ग बंदही केला जाऊ शकतात. नवीन मार्ग सुरू करण्याबाबत मात्र प्रशासन तयार नाही, असे अधिकाºयांनी सांगितले.वषार्नुवर्षे लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांच्या मागणीनुसार अनेक मार्ग सुरू करण्यात आले आहेत. पण त्यातील बरेच मार्गांचा तोटा अधिक आहे. पण दबावामुळे हे मार्ग बंद करता येत नाहीत. याचा विचार करून सर्वच मार्गांचे सुसुत्रीकरण करण्यासाठी विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीची नुकतीच पहिली बैठकही झाली. त्यानुसार पुढील काळात तोट्यातील मार्गांबाबत धोरणात्मक निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.उत्पन्न वाढीसाठी प्रत्येक चालक-वाहकाला दररोजचे उत्पन्नाचे टार्गेट देण्यात आले आहे. दररोज किमान चार हजार रुपये उत्पन्न न मिळाल्यास त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. पण वाहतुक कोंडीमुळे फेºया कराव्या लागत असल्याने कर्मचाºयांना भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे त्यांच्यात नाराजीची भावना आहे. प्रशासन मात्र या कारवाईवर ठाम आहे.