PMPML : पीएमपीच्या पुण्यदशम् बसची दोन वर्षातच दुरावस्था

By नितीश गोवंडे | Published: April 8, 2023 06:23 PM2023-04-08T18:23:50+5:302023-04-08T18:26:06+5:30

बसची दोन वर्षातच दुरावस्था झाल्याने या बसच्या दर्जाबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे...

PMP's Punyadasham bus in poor condition within two years pmpml | PMPML : पीएमपीच्या पुण्यदशम् बसची दोन वर्षातच दुरावस्था

PMPML : पीएमपीच्या पुण्यदशम् बसची दोन वर्षातच दुरावस्था

googlenewsNext

पुणे : शहरातील चिंचोळ्या मार्गांवर मोठ्या बस घेऊन जाणे शक्य नसल्यामुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात ८ मीटरच्या मिनी बसचा (पुण्यदशम्) समावेश करण्यात आला. हा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. पीएमपीच्या ताफ्यात २०२१ मध्ये ५० मिनी एसी बस दाखल झाल्या. पण, या बसची दोन वर्षातच दुरावस्था झाल्याने या बसच्या दर्जाबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

पीएमपीकडून पुणे स्टेशन-स्वारगेट, पुणे स्टेशन-शिवाजी नगर, स्वारगेट-शिवाजीनगर, डेक्कन, पुलगेट अशा विविध ९ मार्गांवर पुण्यदशम् बस सेवा दिली जाते. पीएमपी प्रशासनाने ९ जुलै २०२१ रोजी मोठा गाजावाजा करत ‘दस मे बस’ ही सेवा सुरू केली. नागरिकांनी १० रुपयांचा दैनिक पास काढल्यानंतर दिवसभर या बसमधून प्रवास करता येतो. पण, या बसने प्रवास करणेच नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. कारण या बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत असल्यामुळे नागरिकांना श्वास घेणे देखील कठीण होत आहे. तसेच १० रुपयात दिवसभर एसी बसने प्रवास ही घोषणा देखील फोल ठरल्याचे दिसून येते. कारण, सध्या पुण्यदशमच्या कोणत्याही बसमध्ये एसी सुरू नसल्याचे निदर्शनास आले. तसेच या बसची उंची कमी असल्यामुळे आणि बसच्या सीट देखील एकदम जवळ असल्यामुळे प्रवाशांना बसमधून प्रवास करणे जिकीरीचे ठरत आहे. या बसमध्ये एसी बरोबरच चार्जिंग सुविधा, आपात्कालीन बटन यापैकी काहीच सुरू नाही. दोन वर्षातच बसची इतकी दुरावस्था झाल्याने पीएमपीच्या एकंदरीतच कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

एकतर बस खूप लहान, सीट देखील अत्यंत जवळजवळ असल्याने नीट बसता देखील येत नाही. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याने अनेकदा श्वास गुदमरतो. त्यात उन्हाळा सुरू होऊनही एसी बंद असल्याने या बसने प्रवास करणे म्हणजे तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागतो.
- रेवती गायकवाड, प्रवासी

Web Title: PMP's Punyadasham bus in poor condition within two years pmpml

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.