पीएमपीचे सात मार्गच नफ्यात

By Admin | Published: November 14, 2014 12:46 AM2014-11-14T00:46:57+5:302014-11-14T00:46:57+5:30

तब्बल 11 लाख प्रवाशांसाठी सार्वजनिक वाहतुकीची जीवनवाहिनी असलेल्या पुणो महानगर परिवहन महामंडळ मर्या. लि.ची (पीएमपीएमल) वर्षिक संचलन तूट 252 कोटी रुपयांच्या घरात पोहोचली

PMP's seven outgoing profits | पीएमपीचे सात मार्गच नफ्यात

पीएमपीचे सात मार्गच नफ्यात

googlenewsNext
पुणो : तब्बल 11 लाख प्रवाशांसाठी सार्वजनिक वाहतुकीची जीवनवाहिनी असलेल्या पुणो महानगर परिवहन महामंडळ मर्या. लि.ची (पीएमपीएमल) वर्षिक संचलन तूट 252 कोटी रुपयांच्या घरात पोहोचली असून, पीएमपीचे 412 मधील अवघे 7 मार्गच नफ्यांमध्ये धावत आहेत, तर पीएमपीच्या प्रतिकिलोमीटरचा तोटा 22 रुपयांवर पोचला आहे. राज्यशासनाच्या आदेशानुसार, पीएमपीच्या 2क्13-14च्या वार्षिक लेख्यांची तपासणी महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षकांनी केली असून, या तपासणी अहवालातून या बाबी समोर आल्या आहेत. हा तपासणी अहवाल स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. तर या आर्थिक वर्षात 99 कोटी रुपयांचा तोटा पीएमपीला झाला असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
 
संचलन तूट 252 कोटी, प्रतिकिलोमीटर तूट 22 रुपये 
4या अहवालानुसार, मागील वर्षात पीएमपीचे वाहतूक उत्पन्न 444.32 कोटी रुपये असून, वाहतूक खर्च 7क्2 कोटी रुपयांचा झाला आहे. तर जेएनएनयूआरएमच्या बसचा घसारा, 33.11 कोटी रूपये आहे. हे दोन्ही खर्च वर्षभरात झालेली तिकीटविक्री आणि पासच्या रकमेतून वजा केली असता, संचलनातील तूट 224 कोटी रुपये झाली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर प्रतिकिलोमीटर तूटही या आर्थिक वर्षात मोठय़ा प्रमाणात वाढलेली आहे. या वर्षभरात पीएमपीच्या गाडय़ा सुमारे 1क् कोटी 97 लाख किलोमीटर धावल्या असून, त्यात तब्बल 14 लाख किलोमीटर डेड किलोमीटर आहेत. त्याचा एक रूपयाही पीएमपीला मिळालेला नाही. तर पीएमपीचा प्रतिकिलोमीटर खर्च 64 रुपये येत असून प्रत्यक्षातील वाहतूक उत्पन्न 41 रुपये 85 पैसे आहे. त्यामुळे ही संचलन तूट 252 कोटींच्या घरात पोहोचली आहे. 
 
नफा मिळवून देणारे अवघे सात मार्ग 
4शहरात दररोज पीएमपीच्या सुमारे 13क्क् ते 14क्क् बसेस सुमारे 412 मार्गावर धावतात. त्यांतील अवघे 7 मार्ग नफ्यात असल्याची धक्कादायक बाब या अहवालात नमूद करण्यात आली आहे. तर इतर सर्व मार्ग तोटय़ात आहेत. 
4त्यात या वर्षात बंद केलेले 37 मार्ग, 4क् ते 45 किलोमीटर्पयतचे 7 मार्ग, 31 ते 38 किलोमीटर्पयतचे 36 मार्ग, 21 ते 3क् किलोमीटर्पयतचे 82 मार्ग, 1क् ते2क् किलोमीटर्पयतचे 179 मार्ग, तर 3 ते 1क् किलोमीटर्पयतचे 57 मार्ग आहेत. 
दररोज 3क्  टक्के बस बंद 
4या अहवालानुसार, पीएमपीच्या ताफ्यात, सुमारे 1841 बस आहेत. त्यात पीएमपी आणि पीपीपी तत्त्वावरील 1493 बस, बीआरटीच्या 2क् बस, भाडेतत्त्वावरील 328 बस आहेत. त्यातील केवळ 13क्क् बसच दररोज रस्त्यावर येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. 
4त्यामुळे प्रशासनाने उत्पन्नवाढीसाठी या बंद असलेल्या बस रस्त्यावर आणण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. तर 7 वर्षाहून अधिक आर्युमान असलेल्या सुमारे 4क्क् बस पीएमपीच्या ताफ्यात असून, या बस टप्प्याटप्प्याने कमी करण्याच्या सूचना या लेखापरीक्षणात करण्यात आल्या आहेत. 
जाहिरातीचे उत्पन्न वाढविण्यासाठी सूचना 
4या लेखापरीक्षणात पीएमपीचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रशासनाने जाहिरातीच्या उत्पन्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. अहवालानुसार, पीएमपीला 2क्13-14 मध्ये 1क् कोटी 3क् लाख रुपयांचे उत्पन्न मिळालेले आहे. 
4प्रत्यक्षात पीएमपीच्या ताफ्यात सुमारे 2क्क्क् बस असून, सुमारे 5 हजार बस शेड्स आहेत. त्यापैकी 16क्क् पक्क्या स्वरूपातील शेड्स आहेत. या जागांचा 1क्क् टक्के क्षमतेने वापर केल्यास आणि जाहिरातदर बाजारभावाशी सुसंगत ठेवल्यास हे जाहिरातीचे उत्पन्न 3 ते 4 पटीने वाढू शकते, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

 

Web Title: PMP's seven outgoing profits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.