पीएमपीत डय़ुटी लावण्यासाठीही तोडपाणी!

By admin | Published: December 7, 2014 12:22 AM2014-12-07T00:22:00+5:302014-12-07T00:22:00+5:30

‘कुंपणच शेत खाते’ या उक्तीचा प्रत्यय पुणो महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)च्या सेवेतही येत आहे. ज्या कर्मचा:यांच्या भरवशावर पीएमपीची सेवा गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे,

PMPT to fix a problem! | पीएमपीत डय़ुटी लावण्यासाठीही तोडपाणी!

पीएमपीत डय़ुटी लावण्यासाठीही तोडपाणी!

Next
पुणो : ‘कुंपणच शेत खाते’ या उक्तीचा प्रत्यय पुणो महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)च्या सेवेतही येत आहे. ज्या कर्मचा:यांच्या भरवशावर पीएमपीची सेवा गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे, तेच कर्मचारी  ‘लाइट डय़ुटी’ मिळावी यासाठी अधिका:यांना पैसे चारत आहेत. काही जण तर चक्क कागदावर हजेरी लावून घरी जात असल्याचेही निरीक्षण एका वरिष्ठ अधिका:याने नोंदविले आहे. मात्र, राजकीय वरदहस्त असल्याने त्याविरुद्ध बोलण्याची कोणाची तयारी नाही. 
‘पीएमपी’तील सावळ्या गोंधळाच्या अनेक सुरस कथा समोर येत आहेत. विविध कारणांमुळे सध्या पीएमपी सेवेला अवकळा आली आहे. पैशांअभावी शेकडो बस बंद आहेत. अनेकदा कर्मचा:यांचे पगार करण्यासही प्रशासनाकडे पैसे नसतात. मोडकळीस आलेली शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीही अपुरी पडत आहे. उलट ही ‘राजकीय’ ताकद  ‘पीएमपी’ला आणखी पोखरून टाकण्यासाठी वापरली जात असल्याचे चित्र 
आहे. 
पीएमपीमध्ये डेपो स्तरावर वाहक व चालकांना रोजची डय़ुटी दिली जाते. ही डय़ुटी लावताना संबंधितांवर काही कर्मचारी दबाव टाकतात. त्यासाठी ‘मान्यवरां’ची भीती घातली जाते. त्यानंतर हवी ती डय़ुटी मिळते. काही वेळा आर्थिक देवाणघेवाण केल्यानंतर डय़ुटी बदलूनही मिळते. काही कर्मचा:यांची डय़ुटी तर फक्त कागदावरच असते. एकदा हजेरी लावल्यानंतर हे कर्मचारी पुन्हा कामावर दिसत नाहीत. 
काही  कर्मचा:यांच्या हजेरीची काळजी स्वत: डेपोतील संबंधित अधिकारीच घेतात. त्यामुळे वेळेत कामावर हजर झाले नाही, तरी या कर्मचा:यांचे चालून जाते. ज्या कर्मचा:यांच्या पाठीवर कुणाचाही वरदहस्त नसतो, त्यांना मात्र सर्व नियम पाळावेच लागतात. रोजंदारी कर्मचा:यांना काम दिले जात नाही, असे ‘पीएमपी’तीलच एका माजी कर्मचा:याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)
 
4‘पीएमपी’मध्ये ‘लाइट डय़ुटी’ हा नवीन फंडा रुळला आहे. एखाद्या कर्मचा:याला कुठलेही काम दिले जात नाही. त्याने डय़ुटीच्या वेळेत कुठेही गेले तरी चालते. दिवसभर केवळ कागदावर डय़ुटी दाखवायची. या प्रकारला पीएमपी कर्मचा:यांच्या भाषेत ‘लाइट डय़ुटी’ म्हणतात. ही डय़ुटी काही मर्जीतील कर्मचा:यांनाच लावली जाते.
 
‘डय़ुटी’त तडजोड चालणार नाही 
सर्व कर्मचा:यांना डय़ुटी लावण्याबाबत समान न्याय मिळायला हवा. कोणाच्याही हस्तक्षेपाशिवाय नियमानुसारच डय़ुटीचे वेळापत्रक पाळले गेले पाहिजे. प्रत्येक कर्मचा:याला डय़ुटी मिळायला हवी. हजेरी लावून इतरत्र जाणा:या कर्मचा:यांसह डय़ुटी लावण्याबाबत गैरप्रकार रोखण्यासाठी संबंधित अधिका:यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. 
- प्रवीण अष्टीकर,
सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी
 
4राजकीय किंवा संघटनात्मक वरदहस्त असलेल्या कर्मचा:यांना मनपसंत डय़ुटी लावण्यासाठी दबाव टाकला जातो. त्यामध्ये वाहक व चालकांसह अन्य कर्मचा:यांचाही समावेश आहे.

 

Web Title: PMPT to fix a problem!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.