पीएमआरडीए अर्धा टीएमसीचे दोन प्रकल्प उभारणार : गिरीश बापट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 02:38 PM2018-04-09T14:38:09+5:302018-04-09T14:38:09+5:30
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) स्थापन होऊन तीन वर्षे पूर्ण झाली. या वर्धापन दिनानिमित्त पीएमआरडीएने मागील तीन वर्षांत केलेल्या विविध कामांची बापट यांनी माहिती दिली.
पुणे : नवीन पुण्याच्या विकासासाठी हवेली तालुक्यातील वाघोली आणि मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथे प्रायोगिक तत्वावर (.५) म्हणजे प्रत्येकी अर्धा टीएमसी पाण्याचे प्रकल्प (पुनर्वापर) उभारण्यात येणार आहे. या पाण्यातून परिसरात झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्या आणि इतर सोयीसुविधांसाठी या पाण्याचा उपयोग करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) स्थापन होऊन तीन वर्षे पूर्ण झाली. या वर्धापन दिनानिमित्त पीएमआरडीएने मागील तीन वर्षांत केलेल्या विविध कामांची बापट यांनी माहिती दिली. याप्रसंगी पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे तसेच वडाचीवाडीचे सरपंच दत्रात्रय बांदल आणि होळकरवाडीच्या सरपंच मंगलताई झांबरे उपस्थित होते.
बापट म्हणाले, की पीएमआरडीए बाळसं धरत आहे. या तीन वर्षांत अनेक दीर्घकालीन कामांचे नियोजन करण्यात आले आहे. या कामांसाठी लागणारा निधी, मान्यता, नाागरिकांचे प्रश्न, त्यांची सोडवणूक यासाठी बराच कालावधी जाईल. नव्या पुण्याची विमानातून सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्याचे तसे नकाशे तयार करण्यात आले आहेत. यामध्ये सार्वजनिक रस्ते, वाहतूक व्यवस्था, आरोग्य सुविधा, शाळा, पाणी, ड्रेनेजलाईन आदींच्या यामध्ये अंतर्भाव केला केला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी ते सर्व पीएमआरडीएच्या कार्यालयात उपलब्ध करण्यात आले आहेत.
शिवाजीनगर येथे मेट्रो स्टेशनसाठी गोदामाच्या जागेची नुकतीच मी पाहणी केली आहे. त्याठिकाणी लवकरच जागा ताब्यात घेऊन काम सुरू करणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर या पीएमआरडीएच्या मेट्रोचे काम वेगात सुरू आहेत. त्याचबरोबर महामेट्रोतर्फे होणाऱ्या वनाज-स्वारगेट-निगडी आणि वनाज-शिवाजीनगर-रामवाडी (चंदननगर) या मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे लवकरच पुणेकरांना मेट्रोतून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे, असेही यावेळी बापट यांनी सांगितले.