पीएमआरडीए चार कचरा प्रकल्प उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 02:34 AM2018-09-19T02:34:21+5:302018-09-19T02:34:35+5:30
एमआयडीसीमधील आरक्षित जागेचा विचार; पिंपरी महापालिकेचे सहकार्य
पुणे : पुणे शहरात रस्ते, वाहतूककोंडीबरोबरच कचऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनत चालला आहे. याबाबत येत्या काही काळात उपाययोजना करणे गरजेचे आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए) वतीने पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या सहकार्याने पुणे शहराच्या चारही बाजूला चार कचरा प्रकल्प उभारण्याचे नियोजन सुरू आहे. महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) जागा प्रामुख्याने या प्रकल्पासाठी आपण घेण्याचा विचार करीत असल्याचे पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या जवळपास ५५ ते ६० लाखांच्या पुढे गेली आहे. येत्या पाच वर्षांचा विचार करता पुणे शहराची लोकसंख्या आणखी वाढणार आहे. त्यामुळे कचºयाचा प्रश्न सोडविण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. शहरातील सर्व कचरा फुरसुंगी येथील कचरा डेपोमध्ये जमा केला जातो. मात्र तेथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आणि जागेची उपलब्धता पाहता आपल्याला पर्याय निर्माण करावे लागणार आहेत. फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील ग्रामस्थ सातत्याने आंदोलन, मोर्चे काढत आहेत. या पार्श्वभूमीवर शहराच्या कचºयाच्या प्रश्नाबरोबर शहरालगतच्या पीएमआरडीएच्या हद्दीतील गावांमधील कचºयाचा प्रश्न गंभीर होत आहे. उपनगरांमध्ये किंवा शहरातून बाहेर जाणाºया महामार्गावरील रस्त्यावरच ठिकठिकाणी कचºयाचे ढीग पाहायला मिळत आहे. यातून कचºयाच्या प्रश्नांबरोबर आरोग्याच्या, रोगराईचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. प्रत्येक प्रकल्पासाठी जवळपास ३० हेक्टर जागा (अंदाजे ५० एकरपेक्षा अधिक जागा) जागा यासाठी लागेल.