पुलवामा दहशतवादी हल्ला हे ५६ इंच छातीच्या पंतप्रधानांचे अपयश - पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 01:03 AM2019-02-16T01:03:10+5:302019-02-16T01:03:45+5:30
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला चिंताजनक आहे. संपूर्ण देश शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभा आहे. ही राजकारण करण्याची वेळ नाही.
बारामती (पुणे) : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला चिंताजनक आहे. संपूर्ण देश शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभा आहे. ही राजकारण करण्याची वेळ नाही. पण देशाचं संरक्षण करण्यास ५६ इंच छाती असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना अपयश आले आहे, अशी टीका राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केली.
लष्करी जवानांवर झालेला हल्ला ही चिंताजनक बाब आहे. ज्या मार्गावर हा दहशतवादी हल्ला झाला, तो परिसर तुलनात्मकदृष्ट्या सुरक्षित आहे. मात्र या मार्गावरून सीआरपीएफच्या जवानांचा ताफा जाणार, याची माहिती दहशतवाद्यांना आधीच मिळाली असावी आणि
हीच चिंतेची बाब आहे. एवढा मोठा ताफा जात असताना पुरेशी
काळजी घेतली होती का, यावर
पवार यांनी शंका उपस्थित केली.
मनमोहनसिंग पंतप्रधान असतानाच्या काळात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांवर गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. शिवाय, दहशतवाद्यांना धडा शिकविण्यासाठी ५६ इंच
छाती लागते अशी टीका केली होती, याची आठवण पवार यांनी करून दिली.