पालखीसाठी पीएमपीच्या ९७ जादा गाड्या सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2016 12:52 AM2016-06-25T00:52:35+5:302016-06-25T00:52:35+5:30

अवघ्या आठवड्याभरावर येऊन ठेपलेल्या संत ज्ञानेश्वरमहाराज व संत तुकाराममहाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी पीएमपीकडून तब्बल ९७ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.

PM's 9 7 additional trains to leave for Palakkhi | पालखीसाठी पीएमपीच्या ९७ जादा गाड्या सोडणार

पालखीसाठी पीएमपीच्या ९७ जादा गाड्या सोडणार

Next

पुणे : अवघ्या आठवड्याभरावर येऊन ठेपलेल्या संत ज्ञानेश्वरमहाराज व संत तुकाराममहाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी पीएमपीकडून तब्बल ९७ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यात प्रामुख्याने आळंदी आणि देहूसाठी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. तीर्थक्षेत्र आळंदीसाठी ६५, तर देहूसाठी २० बसेस मार्गावर धावणार आहेत. याशिवाय देहू ते आळंदी या मार्गासाठी बारा बसेसचे नियोजन करण्यात आल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून शुक्रवारी देण्यात आली.
पालखी सोहळ्यानिमित्त शहर, उपनगरांबरोबरच गावागावांतून आळंदी आणि देहू येथे भाविकांची गर्दी होते. त्यामुळे पीएमपीकडून दरवर्षी जादा बसेसचे नियोजन करण्यात येते. २५ ते २९ जूनपर्यंत यंदाही आळंदीसाठी स्वारगेट, मनपा भवन, हडपसर, पुणे स्टेशन, निगडी, भोसरी, हिंजवडी, चिंचवड, पिंपरीरोड या ठिकाणावरून सध्या संचलनात असलेल्या आणि जादा अशा दररोज एकूण ६५ बसेस सोडण्यात येणार आहेत. २८ जून रोजी रात्री १२ पर्यंत आळंदीसाठी बसेस ठेवण्यात आल्या आहेत. देहूकरता पुणे स्टेशन, मनपा, निगडी या ठिकाणाहून सध्या संचलनात असललेल्या व जादा अशा एकूण २० बसेस सोडण्यात येणार आहे. २९ जून रोजी रोजी पालखी प्रस्थान आळंदी येथून होणार असल्यामुळे पहाटे तीनपासून स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर, मनपा भवन येथून जादा ३२ बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

पालखीच्या हडपसर मुक्कामावेळी महात्मा गांधी स्थानक येथून पुणे स्टेशन, वारजे-माळवाडी, कोथरूड डेपो, निगडी, चिंचवड आणि आळंदी या ठिकाणी जाण्यासाठी बसव्यवस्था करण्यात आली आहे. कात्रज-कोंढव्याकडे जाण्यासाठी शिवरकर गार्डन येथून आणि मुंढवा, चंदननगर, तसेच वाघोलीसाठी मगरपट्टा येथून बससेवा उपलब्ध आहे. पालखीदरम्यान दिवे घाट बंद राहणार असल्यामुळे बोपदेव घाटमार्गे वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे.

Web Title: PM's 9 7 additional trains to leave for Palakkhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.