पीएमपीची थकीत रकमेची मागणी
By admin | Published: April 2, 2017 03:07 AM2017-04-02T03:07:14+5:302017-04-02T03:07:14+5:30
महापालिकेने पुणे महानगर परिवहन महामंडळाची सन २०१५-१६ या आर्थिक वर्षातील सवलतीच्या पासची तब्बल ३३ कोटी रुपयांची रक्कम थकवली आहे
Next
पुणे : महापालिकेने पुणे महानगर परिवहन महामंडळाची सन २०१५-१६ या आर्थिक वर्षातील सवलतीच्या पासची तब्बल ३३ कोटी रुपयांची रक्कम थकवली आहे. याशिवाय त्याच वर्षातील संचालन तुटीचे अतिरिक्त असलेले १ कोटी ८ लाख रुपयेही महापालिकेने थकवले आहेत. पीएमपीने या रकमेची मागणी महापालिकेकडे केली असून,
स्थायी समितीच्या येत्या सभेत हा विषय प्रशासनाने मंजुरीसाठी ठेवला आहे.
पास सवलतीचे ३३ कोटी व संचालन तुटीचे अतिरिक्त १ कोटी ८ लाख त्वरित द्यावेत, अशी मागणी पीएमपीने महापालिकाकडे केली आहे. महापालिका प्रशासनाने हा प्रस्ताव स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. समितीच्या येत्या सभेत त्यावर चर्चा होईल.