पीएनजी सन्सची सोने गुंतवणूक २२ कॅरेट गोल्ड बुकिंग योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:10 AM2021-04-18T04:10:14+5:302021-04-18T04:10:14+5:30

कोविड १९ मुळे गेल्या वर्षी लॉकडाउन काळात ग्राहकांची सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी हुकली आहे. सोन्यात घरबसल्या गुंतवणूक करण्यासाठी ही ...

PNG Sons Gold Investment 22 Carat Gold Booking Plan | पीएनजी सन्सची सोने गुंतवणूक २२ कॅरेट गोल्ड बुकिंग योजना

पीएनजी सन्सची सोने गुंतवणूक २२ कॅरेट गोल्ड बुकिंग योजना

googlenewsNext

कोविड १९ मुळे गेल्या वर्षी लॉकडाउन काळात ग्राहकांची सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी हुकली आहे. सोन्यात घरबसल्या गुंतवणूक करण्यासाठी ही योजना फायद्याची ठरेल. कारण यामध्ये २२ कॅरेट सोन्याचे पैसे भरून भाव बुक करता येईल व घडणावळीवर २५ टक्के सवलत मिळेल. योजना ३० एप्रिल २०२१ पर्यंत महाराष्ट्रातील पीएनजी सन्सच्या सर्व दालनांत उपलब्ध आहे, असे पीएनजी सन्सचे प्रवर्तक अजित गाडगीळ यांनी सांगितले.

योजनेसंदर्भात पीएनजी सन्सचे संचालक-साईओ अमित मोडक म्हणाले, की २२ कॅरेट गोल्ड बुकिंग योजनेत एकदाच रक्कम भरता येईल व किमान गुंतवणूक १० हजार रुपयांपासून आहे. पुन्हा रक्कम भरायची असल्यास नव्याने भाव बुक होईल. बँकिंग कालावधीत म्हणजे स. १० ते दु. ३ या वेळेत योजना खुली असेल. योजनेनुसार दागिने खरेदी ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत करता येईल व त्यावर जमा रकमेच्या प्रमाणात सोन्याच्या दागिन्याच्या मजुरीवर २५ टक्के सूट मिळेल. मात्र, जमा रकमेपेक्षा अधिकच्या दागिने खरेदीवर कोणतीही सूट नसेल. पीएनजी सन्सचा २२ कॅरेट सोने भाव हा बहुतांशवेळा बाजाराशी तुलना करता कमी असतो.

लॉकडाउनसदृश परिस्थितीत सोने गंतवणुकीची संधी देणारी ही एकमेव पारदर्शी योजना आहे. पीएनजी सन्सच्या ऑनलाइन पीएनजी व दालनातील सोने-चांदीचा भाव सारखाच असतो आणि हे योजनेचे वैशिष्ट्य आहे. पीएनजी सन्स घरबसल्या याची व्यवस्था ग्राहकांना उपलब्ध करून देत आहे, असे कंपनीचे सीएफओ आदित्य मोडक यांनी सांगितले. (वा.प्र.)

Web Title: PNG Sons Gold Investment 22 Carat Gold Booking Plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.