कवी, गझलकार दीपक करंदीकर यांचे पुण्यात निधन
By श्रीकिशन काळे | Published: February 22, 2024 10:00 AM2024-02-22T10:00:33+5:302024-02-22T10:01:38+5:30
करंदीकर हे गेल्या तीन -चार दशकांपासून गझलकार आणि कवी म्हणून ओळखले जात होते. ...
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह, कवी, गझलकार दीपक करंदीकर यांचे बुधवारी रात्री साडेबाराच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. करंदीकर हे गेल्या तीन -चार दशकांपासून गझलकार आणि कवी म्हणून ओळखले जात होते.
तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे या प्रमुख संस्थेचे ते स्थानिक कार्यवाह म्हणून कार्यरत होते. त्यांचे
‘धुनी गझलांची’ (२००१), ‘कविकुल’ (२००९) हे गझलसंग्रह व कवितासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. ‘गझलगंगा’ हा गझलसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर होता. तर ‘अभिनव श्रीव्यंकटेश माहात्म्य’ (२०१६), ‘संगीत श्रीनिवास-पद्मावती विवाह नाट्य’ – पाच अंकी संगीत नाटक (२०२०) ही श्री तिरुपतीवरील पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीत अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. त्यांचे पाचअंकी संगीत नाटक रसिकांच्या पसंतीस उतरले होते.