शिरुर तालुक्यातील कान्हूरमेसाई येथे विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 03:34 PM2018-12-22T15:34:03+5:302018-12-22T15:36:16+5:30
या शाळेतील ४१ विद्यार्थ्यापैकी ४ विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
ठळक मुद्देउर्वरीत ३७ विध्यार्थ्यांना प्राथमिक उपचार घेतल्यावर घरी सोडले
कान्हूरमेसाई: शिरुर तालुक्यातील कान्हूरमेसाई येथील विद्याधाम हायस्कुलमध्ये मुलांना शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शिजवण्यात आलेल्या खिचडीतून विष बाधा झाल्याची घटना घडली आहे. या शाळेतील ४१ विद्यार्थ्यापैकी ४ विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना शनिवारी दुपारी घडली.पायल सुरेश ननवरे, देवयानी अशोक खैरे, अजिंक्य संदीप दळे, अश्विनी बबन जगदाळे अशी या चार विद्यार्थ्यांची नावे आहेत. यांना मंचर येथील प्राथमिक रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यातील उर्वरीत ३७ विध्यार्थ्यांना कान्हूरमेसाई येथील लघे हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार घेतल्यावर घरी सोडण्यात आलें आहे.