राजेगाव येथे वाळूमाफियांवर पोलिसांची कारवाई,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:07 AM2021-03-30T04:07:26+5:302021-03-30T04:07:26+5:30
:दौंड पोलीस स्टेशन हद्दीत राजेगाव (ता. दौंड) येथील भीमा नदीच्या पात्रात चोरून वाळू उपसा करणाऱ्या वाळूमाफियांवर मोठी कारवाई ...
:दौंड पोलीस स्टेशन हद्दीत राजेगाव (ता. दौंड) येथील भीमा नदीच्या पात्रात चोरून वाळू उपसा करणाऱ्या वाळूमाफियांवर मोठी कारवाई केल्याने वाळूमाफीियांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईत ६० लाख रूपयांचा मुद्देमाल नष्ट केल्याची माहिती दौंड पोलीस स्टेशनचे परि. पोलीस उपअधीक्षक मयुर भुजबळ यांनी माहिती दिली.
काल दिनांक २८ रोजी भुजबळ यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की राजेगाव हद्दीतील भीमा नदीचे पात्रात विष्णू ऊर्फ लाला बलभीम अमनर (रा. मलठण, ता. दौंड) हा आरोपी पुणे जिल्ह्यातून तडीपार असतानाही त्यांने सदर तडीपारी आदेशाचे उल्लंघन करून व तेजस मोरे व अमोल मोरे (दोघेही रा. खेड, ता. कर्जत, जि. अहमदनगर) व अंकुश ठोंबरे (रा. गणेशवाडी, जि. अहमदनगर) व इतर दोन वाळूचोरी करीत आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर सदर ठिकाणी कारवाई करण्याकामी दौंड तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे मदतीने छापा घातला. एकूण ६०,००,०००/-रूपये (साठ लाख रुपये) किमतीच्या वाळू उपसा करण्याकरिता वापरल्या जाणाऱ्या यांत्रिकी फायबर बोटी मिळून आल्या. त्या जागीच महसूल कर्मचारी यांचे मदतीने जिलेटीनच्या साहाय्याने स्फोट घडवून नष्ट करून टाकल्या. तपास सहा. पोलीस फौजदार संतोष शिंदे हे करीत आहेत.