वेल्हे तालुक्यात सुट्टीच्या दिवशी मोकाट फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई! ७५ हजाराचा दंड वसूल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 09:51 PM2021-06-13T21:51:46+5:302021-06-13T21:51:54+5:30

तालुक्यात किल्ले राजगड, तोरणा व मढेघाट यावर जाण्यास बंदी घातली असूनही पर्यटक सुट्टीच्या दिवशी या परिसरात आले

Police action against those wandering around Mokat on holiday in Velhe taluka! 75 thousand fine recovered | वेल्हे तालुक्यात सुट्टीच्या दिवशी मोकाट फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई! ७५ हजाराचा दंड वसूल

वेल्हे तालुक्यात सुट्टीच्या दिवशी मोकाट फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई! ७५ हजाराचा दंड वसूल

Next
ठळक मुद्दे करंजावणे येथे पोलिसांनी चेकपोस्टवर दिवसभरात दंड वसूल केला

मार्गासनी: सुट्टीच्या दिवशी मोकाट फिरणाऱ्यांवर वेल्हे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आज एका दिवसात ७५ हजारांचा दंड वसूल केला आहे. अशी माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी दिली. 

याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, वेल्हे तालुक्यात किल्ले राजगड किल्ले तोरणा व मढेघाट या वर जाण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. तरी देखील काही मोकाट पर्यटक सुट्टीच्या दिवशी या परिसरात आले होते. करंजावणे येथे पोलिसांनी चेक पोस्ट लावला होता. या चेकपोस्टवर दिवसभरात पोलिसांकडून पंच्याहत्तर हजाराचा दंड आज एका दिवसात वसूल केलेला आहे. 

पाच जूनला किल्ले तोरण्यावर किल्ल्याची नासधूस करण्यात आलेली होती. तसेच बेकायदेशीरपणे उत्खनन सुरू होते. आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी किल्ले राजगड व किल्ले तोरणा यांच्यावर जाण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. तरी देखील आज हौशी पर्यटक आलेले होते. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. 

Web Title: Police action against those wandering around Mokat on holiday in Velhe taluka! 75 thousand fine recovered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.