विश्रांतवाडीत जुगारधंद्यावर धाड : वीस हजाराच्या "चिल्लरसह" रोख पावणेचार लाखाची रक्कम जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 09:14 PM2019-03-07T21:14:05+5:302019-03-07T21:18:18+5:30
शहरातील सर्व अवैध धंदे बंद असल्याचा दावा करणार्या पोलिसांचा विश्रांतवाडी येथील जुगार अड्डयावरील मोठ्या कारवाईने पितळ उघडे पडले आहे.
पुणे - शहरातील अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी पुणे पोलिसप्रमुख आयुक्तांनी सर्व प्रभारी अधिकार्यांना आदेश दिलेले असताना विश्रांतवाडी परिसरातील अवैध धंदे खुलेआम सुरु होते. सहाय्यक पोलिस आयुक्त डाँ.शिवाजी पवार यांनी केलेल्या येथील अवैध धंद्यावरील मोठ्या कारवाईत तब्बल पावणेचार लाखाची रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली. गंभीर बाब म्हणजे अवैध धंद्यामधील सराईत तडीपार आरोपी गुंड्या उर्फ सूरज माचरेकर सह विनोद माचरेकर व प्रविण पालेकर या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या मोठ्या रेडमधून सराईत तडीपार आरोपी "गुंड्डया" व त्याचा भाऊ विनोद हे या मोठ्या कारवाईतून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाले.
विश्रांतवाडी भिमनगर परिसरातील सराईत तडीपार आरोपी गुंड्ड्या हा त्याच्या घरात अवैध मटका जुगार घेत असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक आयुक्त डाँ.शिवाजी पवार यांना मिळाली होती.सहाय्यक निरीक्षक सुशिल बोबडे,उपनिरीक्षक एम.पी.भांगे यांच्यासह येरवडा, विमाननगर, चंदननगर पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ सापळा रचून कारवाई केली.
रेडमधून पोलिसांच्या हातावर तुरी देत या धंद्यांचा मुख्य सुत्रधार तडीपार गुन्हेगार गुंड्डया व त्याचा भाऊ विनोद फरार झाले.रायटर प्रविण पालेकर याला जुगाराचे साहित्य व रोख रकमेसह पोलिसांनी ताब्यात घेतले.याप्रकरणी पोलिसांनी जुगार अँक्टसह तडिपारीचा भंग केल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.पूर्व विभागाचे अपर पोलिस आयुक्त सुनिल फुलारी,पोलिस उपायुक्त प्रसाद अक्कानवरु यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस आयुक्त डाँ.शिवाजी पवार यांनी हि कारवाई केली. अधिक तपास विश्रांतवाडी पोलिस करीत आहेत.
अवैध धंदेवाल्यांची पाळेमुळे उखडणार - अपर पोलिस आयुक्त सुनिल फुलारी
विश्रांतवाडी येथील मटका जुगार अड्ड्यावरील मोठ्या कारवाईची पोलिसांनी गंभीर दखल घेत याप्रकरणातील आरोपींची पाळेमुळे शोधून त्यांना जेरबंद करण्याच्या सूचना संबधित विभागाचे अधिकार्यांना देण्यात आल्याची माहिती पूर्व विभागाचे अपर पोलिस आयुक्त सुनिल फुलारी यांनी दिली.यापुढिल काळात देखिल अवैध धंद्यावर सातत्याने धडक कारवाया सुरु राहणार असून अवैध धंदे चालविणार्यांची आर्थिक माहिती गोळा करुन त्यांच्यावर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.अवैध धंदेवाल्यांना मदत करणार्यावर देखिल पोलिसांची नजर राहणार असून यापुढिल काळात हे सर्व अवैध धंदे पुर्णपणे बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.