गणेशोत्सवातील सुरक्षेकरिता पोलीस प्रशासन सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 08:10 PM2019-08-30T20:10:52+5:302019-08-30T20:11:17+5:30
पोलिसांकडून गणेशोत्सव बंदोबस्ताची तयारी सुरू करण्यात आली असून बंदोबस्ताची आखणी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
पुणे : दैदीप्यमान आणि गौरवशाली अशी भव्य परंपरा असलेल्या पुण्यातील गणेशोत्सवाला येत्या सोमवारी सुरुवात होणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शहरात उत्सवाच्या काळात तब्बल सात हजार पोलिसांची फौज देखरेख करणार आहे. इतकेच नव्हे तर सुरक्षेकरिता इतर शहरांमधून देखील अतिरिक्त कुमक मागविण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे.
पोलिसांकडूनगणेशोत्सव बंदोबस्ताची तयारी सुरू करण्यात आली असून बंदोबस्ताची आखणी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी पोलिसांकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पुणे शहरात नोंदणीकृत ३ हजार २४५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त मितेश घट्टे यांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे. उत्सवाच्या कालावधीत मध्य भागातील मानाची मंडळे तसेच प्रमुख मंडळांच्या परिसराची बॉम्बशोधक नाशक पथकाकडून तपासणी करण्यात येणार आहे. प्रमुख मंडळांच्या मांडवांच्या परिसरात धातुशोधक यंत्रे (मेटल डिटेक्टर) बसविण्यात येणार आहेत. ध्वनिवर्धकासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निदेर्शांचे पालन मंडळांनी करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
शहरातील संवदेनशील तसेच महत्त्वाच्या ठिकाणी राज्य राखीव दलाच्या तुकड्या (एसआरपीएफ) तैनात करण्यात येणार आहेत. गृहरक्षक दलातील जवान (होमगार्ड) मध्यभागात बंदोबस्तासाठी राहणार आहेत. बेलबाग चौक, मंडई परिसरात गर्दी होते. या परिसरात महिला भाविकांचे दागिने, पर्स तसेच मोबाइल लांबवण्याचे प्रकार होतात. मध्य भागात साध्या वेशातील पोलिसांचे पथक गस्त घालणार आहे. छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी महिला पोलिसांचे पथक तसेच गुन्हे शाखेचे पथक तैनात करण्यात येणार आहे.
* तीस हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविले.
मागील तीन महिन्यांपासून शहरातील गंभीर गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी ह्यसीवॉचह्णयोजनेअंतर्गत व्यापाºयांना सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन केले होते. या योजनेअंतर्गत शहरात खासगी सहभागातून तीस हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सीसीटीव्ही कॅमेºयांच्या माध्यमातून मध्य भागातील महत्त्वाच्या मंडळांच्या परिसरावर पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येणार आहे. संशयित व्यक्ती तसेच बेवारस वस्तू आढळल्यास तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.