पोलीसच करताहेत जीव मुठीत धरून काम, भिंती झाल्या आहेत जीर्ण, डोक्यावर अधांतरी कुजलेले पत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:14 AM2017-09-23T00:14:18+5:302017-09-23T00:14:21+5:30
ज्या पोलिसांनी नागरिकांचे रक्षण करायचे त्यांनाच भाड्याच्या खोलीत राहून जीव मुठीत घेऊन काम करावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
वालचंदनगर : ज्या पोलिसांनी नागरिकांचे रक्षण करायचे त्यांनाच भाड्याच्या खोलीत राहून जीव मुठीत घेऊन काम करावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील पोलीस ठाणे नाव वालचंदनगरचे मात्र पोलीस ठाणे जंक्शन, अंथुर्णे हद्दीत आहे. या पोलीस ठाण्याची ओळख करून देण्यासाठी नावाचे बोर्डही नसल्याने अनेकांना घर आहे का पोलीस ठाणे आहे, हे कळत नाही. या पोलीस ठाण्याला स्वत:ची इमारत नसल्याने स्थापनेपासून २ रुपये भाड्याच्या खोल्यांत कामकाज करण्याची वेळ आली आहे. छतावरील पत्रे कुजल्याने व जीर्ण भिंती झाल्याने जीव मुठीत धरून गळक्या खोल्यांत पोलिसांना कामकाज करावे लागत आहे.
या पोलीस ठाण्याला स्वतंत्र इमारत करण्यात यावी, अशी येथील कर्मचाºयांची मागणी गेल्या १५ वर्षांपासून होताना दिसत आहे. २७ पोलीस ठाण्याच्या स्थापनेपासून हे पोलीस ठाणे चार खोल्यांच्या मासिक १० रुपये भाडेतत्त्वावर आहे. कोणतीही डागडुजी करणे अवघड झाल्याने जीर्ण भिंती गळक्या इमारतीतच कर्मचाºयांना कामकाज करण्याची वेळ ओढवली आहे. या पोलीस ठाण्याला नवीन स्वतंत्र इमारत व पोलीस वसाहती निर्माण करण्यासाठी शासनाने ८० लाख रुपये देऊन ५ एकर जमीन देण्यात आली. परंतु, अनेक अधिकारी आले गेले, तालुक्याचे प्रतिनिधीही बदलले तरीही इमारत झालेली नाही. या पोलीस ठाण्याचे उद्घाटन तत्कालीन पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण व खासदार कै. शंकरराव बाजीराव पाटील यांच्या हस्ते सन ५ आॅगस्ट १९९० मध्ये करण्यात आलेले आहे.
या खोल्या शेती महामंडळाच्या मालकीच्या आहेत. त्यामुळे डागडुजी करण्यात अनेक अडथळे निर्माण होत आहेत. जुने पत्रे एकावर एक टाकून दिवस काढण्याची वेळ येथील कर्मचाºयांवर आली आहे. पावसाळ्यात सर्वत्र पाणी या खोल्यांमध्ये येते, यामुळे महत्त्वाची कागदपत्रे भिजण्याची भीती आहे.
१५ वर्षांपूर्वी शेती महामंडळाला पोलीस ठाण्याच्या नियोजित नवीन इमारतीसाठी शासनाने ५ एकरांसाठी ८० लाख रुपये मोजलेले आहेत. त्यांची जागा निश्चित न झाल्याने व योग्य निधी उपलब्ध न झाल्याने गेल्या २७ वर्षांपासून पोलीस कर्मचाºयांना आपल्या हक्काच्या वसाहतीपासून वंचित राहावे लागले आहे.
>१५ वर्षांपासून मागणी प्रलंबित...
स्वत:ची इमारत नसल्याने स्थापनेपासून २ रुपये भाड्याच्या खोल्यांत कामकाज करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे हक्काच्या इमारतीची अद्यापही प्रतीक्षा आहे. छतावरील पत्रे कुजल्याने व जीर्ण भिंती झाल्याने जीव मुठीत धरून गळक्या खोल्यांत पोलिसांना कामकाज करावे लागत आहे. ही परिस्थिती कधी बदलणार?या पोलीस ठाण्याला स्वतंत्र इमारत करण्यात यावी, अशी येथील कर्मचाºयांची
मागणी गेल्या १५ वर्षांपासून होताना दिसत आहे. मात्र
अद्याप ती पूर्ण झाली नाही.