पोलीस घालताहेत सायकलवर गस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:11 AM2021-03-21T04:11:53+5:302021-03-21T04:11:53+5:30

पुणे : शहरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलीसांकडून दुचाकी किंवा चारचाकीमधून गस्त घातली जाते. पण आता पोलीस ...

Police are patrolling on bicycles | पोलीस घालताहेत सायकलवर गस्त

पोलीस घालताहेत सायकलवर गस्त

Next

पुणे : शहरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलीसांकडून दुचाकी किंवा चारचाकीमधून गस्त घातली जाते. पण आता पोलीस सायकलवर ही गस्त घालत आहेत. या उपक्रमाची सुरवात समर्थ पोलीस ठाण्यापासून झाली आहे. त्यांच्या हद्दीत १० सायकलींवर पोलीस गल्लीबोळीत गस्त घालत आहेत.

उपक्रमाचे उद‌्घाटन सहपोलीस आयुक्त डॅा. रवींद्र शिसवे, पालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते झाले. या वेळी पोलीस उपायुक्त सागर पाटील, भाजप सभागृह नेते गणेश बिडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम उपस्थित होते.

शहराच्या अनेक भागात झोपडपट्टी आहे. त्या ठिकाणी दुचाकी किंवा चारचाकी घेऊन जाता येत नाही. त्यामुळे सायकलवर गस्त घालताना अरूंद रस्त्यांमधूनही जाता येणार आहे. या सायकली गिअरच्या असून, पोलीसांनी शुक्रवारपासून गस्त सुरू केली आहे. ठराविक वेळेत गस्त घातली जाणार आहे. त्यामुळे पोलीसांचे आरोग्यही चांगले राहणार आहे. हा प्रायोगिक तत्वावरील प्रयोग असून, येथे यशस्वी झाला, तर शहरभर सायकलींवर पोलीस गस्त घालताना दिसतील.

पर्यावरणपूरक गस्त घालण्याचा हा उपक्रम राज्यात प्रथमच पुण्यात राबविला जात आहे. गाडीवर गस्त घालताना अनेक छोट्या गोष्टींकडे लक्ष जात नाही. पण सायकलवर मात्र सर्व गोष्टींवर लक्ष जाते. त्यामुळे हा उपक्रम अतिशय उपयुक्त असल्याचे मत समर्थ पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले.

Web Title: Police are patrolling on bicycles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.