हॉटेलवर पोलिसांचा छापा, ७ मुली ताब्यात
By admin | Published: May 14, 2016 12:29 AM2016-05-14T00:29:55+5:302016-05-14T00:29:55+5:30
पोलीस ठाण्यापासून शंभर मीटर अंतरावर असणाऱ्या एका हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकून तेथे असभ्य वर्तन करणाऱ्या ७ मुलींना ताब्यात घेतले.
शिरूर : पोलीस ठाण्यापासून शंभर मीटर अंतरावर असणाऱ्या एका हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकून तेथे असभ्य वर्तन करणाऱ्या ७ मुलींना ताब्यात घेतले. हॉटेलच्या (लॉज) चालकासह तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना अटक करून आज न्यायालयात हजर केले
असता न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.
श्रेयांस लॉजवर मुली असभ्य वर्तन करीत असल्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता शिरूर व रांजणगाव पोलिसांच्या पथकाने गुरुवारी (दि. १२) रात्री छापा टाकला. या वेळी लॉजमध्ये पथकाल सात मुली मिळून आल्या.
या मुलींसह पथकाने लॉजचा चालक हरीश श्रीधर शेट्टी, कर्मचारी रमण उत्तम चक्रवर्ती व योगेश तुकाराम होले या तिघांनाही अटक केली. आज शिरूर न्यायालयात या दहा जणांना हजर केले असता न्यायालयाने दंडात्मक कारवाई करून सर्वांना जामिनावर मुक्त केले. या लॉजवर मुलींच्या वावराबाबत लॉजच्या लगतच्या इमारतीतील नागरिकांच्या तक्रारी होत्या. त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रारीही केल्याचे समजते. पोलिसांच्या कारवाईने नागरिक सुखावले आहेत. पोलिसांनी कारवाई केली असली तरी लॉजमधील मुलींबाबत गेल्या वर्षभरापासून दबक्या आवाजात चर्चा होती. मात्र समोर कोणी येत नव्हते. शहरातील प्रतिष्ठित व्यापाऱ्याचे हे लॉज असून, त्यांनी लॉज चालविण्यास दिले आहे.(वार्ताहर)