पोलिसांना अपशब्द वापरणा-यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 06:43 AM2017-12-23T06:43:55+5:302017-12-23T06:44:12+5:30
रात्री उशिरा बाहेर थांबलेल्या चौघांना गस्त घालणा-या पोलिसांनी घरी जाण्यास सांगितल्याच्या कारणावरून चिडून चौघांनी पोलिसांना अपशब्द वापरून बघून घेण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. डहाणूकर कॉलनीतील लेन क्रमांक ३ मध्ये प्रगती अपार्टमेंट या इमारतीत असलेल्या बंद दुकानासमोर बुधवारी रात्री ११ च्या सुमारास हा प्रकार घडला.
पुणे : रात्री उशिरा बाहेर थांबलेल्या चौघांना गस्त घालणा-या पोलिसांनी घरी जाण्यास सांगितल्याच्या कारणावरून चिडून चौघांनी पोलिसांना अपशब्द वापरून बघून घेण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. डहाणूकर कॉलनीतील लेन क्रमांक ३ मध्ये प्रगती अपार्टमेंट या इमारतीत असलेल्या बंद दुकानासमोर बुधवारी रात्री ११ च्या सुमारास हा प्रकार घडला.
पोलीस शिपाई जी. एस. मुलाणी यांनी याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून रमेश शंकर पवार (वय २९), बबन शंकर पवार (वय २२, दोघेही रा. डहाणूकर कॉलनी), अजय केशव देवरे (वय २५, वडगाव) आणि रमेश मोतीराम राठोड (वय २२, उरुळी कांचन, ता. हवेली) या चौघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे डहाणूकर कॉलनीतील बंद दुकानासमोर बसलेले असताना मुलाणी यांनी त्यांना हटकले. येथे बसू नका आपापल्या घरी जा, असे मुलाणी यांनी आरोपींना सांगितले. त्यावर त्याने अपशब्द वापरले.