खळबळजनक! दिघीत महिला सहकाऱ्याशी असलेल्या प्रेमसंबंधातून पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 07:18 PM2021-01-19T19:18:01+5:302021-01-19T19:19:17+5:30
आरोपीचे महिला पोलिसाशी गेल्या दीड वर्षापासून प्रेमसंबंध होते.
पिंपरी : महिला सहकाऱ्याशी असलेल्या प्रेमसंबंधाच्या वादातून पोलीस शिपायाने ठाण्याच्या इमारतीतून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी अनिल संपत निरवणे या पोलीस शिपायाविरोधात दिघी पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक अशोक भागवत तरंगे यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीचे महिलापोलिसाशी गेल्या दीड वर्षापासून प्रेमसंबंध होते. त्यावरून त्यांच्यात पोलीस ठाण्यातच वादविवाद झाला. आरोपीने महिलेला आमच्यासमोर जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच, स्वत:च्या जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी देऊन दिघी पोलीस ठाण्याच्या टेरेसवरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.