पुणे शहरात आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांचा लाठीचार्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 03:10 PM2022-04-19T15:10:15+5:302022-04-19T15:24:48+5:30
पुणे : शहरातील कात्रज परिसरात पोलिसांनी उपोषणाला बसलेल्या गावकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याचे घटना घडली आहे. कात्रज परिसराचा पुणे महापालिकेत समावेश होऊन ...
पुणे : शहरातील कात्रज परिसरात पोलिसांनी उपोषणाला बसलेल्या गावकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याचे घटना घडली आहे. कात्रज परिसराचा पुणे महापालिकेत समावेश होऊन दोन दशकांपेक्षा जास्त काळ उलटला असल्या तरी त्या परिसरात म्हणावा तसा विकास न झाल्याने तिथं आमरण उपोषण सुरू होतं. गेल्या दोन दिवसांपासून गावकऱ्यांनी कात्रजमध्ये ठिय्या मांडला होता. अखेर पोलिसांनी लाठीचार्ज करत नागरिकांना हुसकावून लावलंय.
कात्रज परिसराचा पुणे मनपात समावेश होऊन 25 वर्षे झाली तरी मुलभूत सुविधा आणि विकास होत नसल्याचा स्थानिकांचा आरोप होता. यासाठी नरेश बाबर यांच्यासह नागरिकांनी कात्रज परिसरात आंदोलन सुरू केले होते. कात्रज, गुजर-निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी परिसरातील नागरिकही यावेळी उपस्थित होते. त्यावेळी पोलिसांनी नागरिकांवर लाटीचार्ज केला आहे.