बंदोबस्ताबरोबरच पोलीस बनले ‘मदतदूत’; लोकांनी घरी राहावे म्हणून करताहेत हे काम 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 09:35 PM2020-04-22T21:35:57+5:302020-04-22T21:41:19+5:30

सोशल पोलिसिंग सेलमार्फत केली जात आहेत मदत..

The police became 'helpers' along with security; People are doing this to stay at home | बंदोबस्ताबरोबरच पोलीस बनले ‘मदतदूत’; लोकांनी घरी राहावे म्हणून करताहेत हे काम 

बंदोबस्ताबरोबरच पोलीस बनले ‘मदतदूत’; लोकांनी घरी राहावे म्हणून करताहेत हे काम 

googlenewsNext
ठळक मुद्देअपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोशल पोलिसिंग सेल २५ मार्चपासून कार्यन्वित काही ठिकाणी आता घरपोचकिराणा सामान पोहचविण्याचा प्रयत्न सुरु मेडिकल असोशिएशनचे प्रतिनिधी आणि वेगवेगळ्या १९ डॉक्टरांच्या संघटना यांच्याशी सुसंवाद पोलिसांचा शहरातील तब्बल १६३ स्वयंसेवी संस्थांशी समन्वय

पुणे :  लॉकडाऊनच्या काळात कायदा सुव्यवस्था सांभाळण्याबरोबरच पोलिसांना अनेक कामे करावी लागत आहे. या काळात पोलीस केवळ रस्त्यावरच उतरले नाही तर शहरातील अगदी उच्चभ्रु समाजातील लोकांनापासून अगदी रस्त्यावर राहणाऱ्या  मजूरांपर्यंत समाजाच्या सर्व घटकांपर्यंत आपल्या मदतीचा हात वेगवेगळ्या मागार्ने पुरवित आहे. लोकांनी घरात रहावे म्हणून त्यांनी लोकांना झोडपले़, लोकांना भर रस्त्यावर उठाबश्या काढायला लावल्या,याची चर्चा आणि व्हिडिओ खूप व्हायरल झाले. पण, त्यापुढे जाऊन गेले महिन्याभर पोलीस सोशल पोलिसिंग सेलच्या माध्यमातून आतापर्यंत ६ लाख अन्न पाकिटांचे वितरण केले आहे.
अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोशल पोलिसिंग सेल २५ मार्चपासून कार्यन्वित झाला आहे.  त्याचबरोबर आजवर कधीही न केलेली असंख्य कामे सध्या शहर पोलीस करीत आहेत. त्यासाठी शहरातील तब्बल १६३ स्वयंसेवी संस्थांशी समन्वय साधण्यात आला आहे. होम क्वारंटाईन केलेलेसर्व घरीच रहात आहे. पोलिसांचा  ना याची दररोज तपासणी केली जात आहे. त्याचवेळी गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी नवीन काम सुरु केले आहे. शहरातील मध्य वस्तीत साडेतीन हजार देवदासी, ६०० तृतीयपंथी, हॉस्पिटलमध्ये दाखल असलेले व त्यांची देखभाल करणारे अशा सर्वांना मार्फत जेवण, फुड पॅकेट पुरविण्यात येत आहे. रस्त्यावर राहणाऱ्या १३६५ बेघरांना शेल्टरमध्ये सोय, त्यांच्या जेवणाची सोय केली आहे. ४९ मजूर कॅम्पमधील १७हजार लोकांना मदत पुरविण्यात येत आहे़.
डेक्कन जिमखाना, लॉ कॉलेज रोड, शिवाजीनगर या भागातील मोठ्या सोसायट्यांसाठी स्वयंसेवी संस्थेमार्फत भाजीपाला विक्रीचे व्यवस्थापन सुरु आहे. शहरातील ७६३ किराणा दुकानदारदारांशी ट्रॅक वॉच या संकेत स्थळावरुन ग्राहक आपली सामानाची यादी देऊन सामान घेऊ शकतात. काही ठिकाणी आता घरपोचकिराणा सामान पोहचविण्याचा प्रयत्न सुरु आहे. पुण्यातील इंडियन मेडिकल असोशिएशनचे प्रतिनिधी आणि वेगवेगळ्या १९ डॉक्टरांच्या संघटना यांच्याशी सुसंवाद साधून कोरोना व्यतिरिक्त इतर रुग्णांवर उपचार करण्यासाठी त्यांनी दवाखाने उघडे ठेवावेत, यासाठी डॉ. शिंदे यांनी व्यक्तीश प्रयत्न केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
......
शहरातील ८०० पॉझिटिव्ह राहतात, मिनी हॉटस्पॉट त्यांच्या बाजूच्या प्रत्येकी १० घरातील लोकांनी घरातच रहावे, यासाठी सॅनिटायझर, मास्क, साबण पुरविणे व साहित्य वाटप करण्यात येत आहे. इतके करुनही लोक घराबाहेर पडत असल्याने वाहन रस्त्यावर आणणाऱ्यांनी पूर्वी केलेल्या वाहतुक नियमभंगाच्या गुन्हांच्या दंड वसुली करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांना सर्व आवश्यक ती काळजी घेण्यास सांगितले आहे़. लोकांना रस्त्यावर प्रतिबंधित करण्याचा कायदेशीर उपाय म्हणून ही कारवाई आता सुरु असल्याचे डॉ. संजय शिंदे यांनी सांगितले.
....
शहरात इतके भितीचे वातावरण असताना, लोकांच्या आजू बाजूला राहणारे कोरोनाबाधित झाल्याचे दिसून येत असताना आपल्याला काही होणार नाही, असे समजून लोक कसे घराबाहेर पडतात, याचेच आश्चर्य वाटत असल्याचे अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी सांगितले.

Web Title: The police became 'helpers' along with security; People are doing this to stay at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.