'ना सासर ना माहेर' ; २६ वर्षीय महिलेच्या अंत्यविधीसाठी 'खाकी वर्दी' आली समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 09:37 PM2020-05-28T21:37:47+5:302020-05-28T21:58:08+5:30
रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्यामुळे व वेळेत उपचार न मिळाल्याने या महिलेचा मुत्यू झाला.
राजगुरुनगर: सासर व माहेर मृतदेह ताब्यात घेईना त्यामुळे एका २६ वर्षीय महिलेचा खाकी वर्दीतील माणसुकी दाखवत महिलेचा अंत्यविधी केला असल्याची घटना राजगुरूनगर शहरात घडली आहे. याबाबत माहिती अशी की , कडुस येथील महिला दुर्धर आजाराने ग्रस्त होती. ४ दिवसापुर्वी चांडोली येथील ग्रामिण रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आली होती.आजार जास्त बळावल्यामुळे डॉक्टारांनी तिला पुणे येथे उपचारासाठी जाण्यास सांगितले. रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्यामुळे व वेळेत उपचार न मिळाल्याने या महिलेचा चांडोली येथेच मृत्यू झाला. दरम्यान पोलिसांना कळविण्यात आले खेडपोलिस कर्तव्यदक्ष पोलिस हवालदार संतोष मोरे यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेऊन महिलेच्या पती व आई भावाला कळविले. मात्र पती नगर येथे कामास असल्यामुळे तो येऊ शकला नाही. आई व भाऊ यांना सांगितले असता त्यांनी सांगितले, साहेब गावात कोरोना आला आहे. त्यामुळे गावात मूत्यदेह येऊ देणार नाही अशी तंबी दिली आहे. तसेच आम्ही गरिब माणसे अंत्यविधीसाठी सुध्दा पैसे नाही. आम्ही काय करू तुम्हीच सांगा साहेब... असे म्हणताच पोलिस कर्मचारी मोरे यांनाही गहिवरुन आले. एक सामाजिक बांधिलकी जपत एका रुग्णवाहिकेला बोलविले. तसेच कडूस गावाच्या पोलिस पाटील यांना बोलवून घेऊन नातेवाईकांसह स्व:ता पदरमोड करुन अंत्यविधीसाठी लागणारे साहित्य खरेदी केले. व अंत्यविधी करण्यात आला. त्यामुळे या पोलिस कर्मचाऱ्याचे कौतुक होत आहे